Type to search

maharashtra जळगाव

सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील अपघातातून बचावले

Share
मुक्ताईनगर । वार्ताहर- शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे वरणगावकडून मुक्ताईनगरकडे येत असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याने ते बालंबाल बचावले. सदर घटना रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की काल दिनांक 18 रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत लिंबाजी पाटील हे वाढदिवसानिमित्त कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी मुक्ताईनगर येथून सायंकाळी वरणगाव येथे गेले होते. बाहेरगावी जात असताना त्यांच्यासोबत नेहमी कार्यकर्त्यांचा व मित्रमंडळींचा गराडा असतो परंतु यावेळेस मात्र चंद्रकांत पाटील हे ते स्वतः वाहन चालवत एकटेच या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर सदरचा वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून ते त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या एम. एच. 18/77 76 या चारचाकी वाहनाने मुक्ताईनगरकडे येत होते. त्याच वेळेस भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अचानक एक गुजरात पासिंग चे कंटेनर रस्त्यावर आल्या नाही. कंटेनर व चंद्रकांत पाटील यांचे वाहन यांच्यात अपघात झाला त्यात पाटील यांच्या वाहनात जोरदार धडक लागून समोरील व वाहनाच्या बाजूचे मोठे नुकसान झालेले आहे आणि एवढ्या मोठ्या अपघातातून एअर बॅग असल्याने जिल्हाप्रमुख बालंबाल बचावले पण तरीही त्यांच्या मानेवर तसेच हातावर काचेच्या जखमा झालेल्या आहेत अपघात होता बरोबर त्या ठिकाणी वरणगाव येथील पोलीस स्टेशनचे एपीआय वाघ पोलीस पथक दाखल झाले व त्यांनी तात्काळ चंद्रकांत पाटील यांना दवाखान्यात हलविले. भुसावळ येथील डॉक्टर तुषार पाटील यांच्या रुग्णालयात चंद्रकांत पाटील यांच्यावर उपचार करण्यात आले उपचारानंतर चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी सध्या आराम करीत आहे त्यांची तब्येत चांगली असल्याचे समजते.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी-
दरम्यान जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात जिल्हाप्रमुख जखमी झाल्या ची वार्ता जिल्हाभरात पसरता बरोबर जिल्ह्याभरातील कार्यकर्त्यांनी विचारपूस करण्यासाठी गर्दी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!