Thursday, May 2, 2024
Homeजळगावबस वाहतुकीत होतेय वाढ

बस वाहतुकीत होतेय वाढ

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

येथील आगारातून सोमवार 31 रोजी जवळपास 21 बसेस सोडण्यात आल्या असून आजमितीस 30 ते 35 टक्के एसटी वाहतूक

- Advertisement -

पूर्वपदावर येत असल्याची माहिती आगारप्रमुख निलेश पाटील, वाहतूक निरीक्षक नीलिमा बागूल यांनी दिली.सध्या कोरोनाच्या महामारीमुळे शेड्युलप्रमाणे सर्वच बसेस न सोडता प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस सोडल्या जात आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस दि. 20 पासून पुन्हा रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जळगाव आगारातून तब्बल पाच महिन्यानंतर लालपरीची ये जा सुरू झाली आहे.

पहिल्या दिवशी तीन बसेस सोडण्यात आल्या होत्या यात हळुहळू वाढ होत असून प्रवाशांच्या संख्या वाढली की बसेस वाढतील असेही श्री. पाटील यांनी सांगितले. गेल्या चार दिवसापासून प्रवाशांकडून हळुहळू मागणी वाढत गेली त्याप्रमाणे बसेस आगारातर्फे सोडण्यात येत आहेत.

बाहेरील आगाराच्या बसेसही वाढू लागले आहेत. मात्र शेड्युलप्रमाणे बसेस धावण्यात अद्यापही 8 ते 10 दिवस लागतील असेही आगार अधिकार्‍यांनी सांगितलेे.

लांबपल्ल्याच्या बसेस सुरु

आठ दिवसात जळगाव आगारातील बसेससह बाहेरील बसेसही वाढणार असल्याचे संकेत आगारप्रमुखांनी दिले आहेत. लांब पल्ल्याचे बसेससाठी प्रवासी मिळत आहेत.

जळगाव बसस्थानकात हळुहळू प्रवाशांची संख्या वाढत असून सध्या जेथून मागणी आली किंवा बसस्थानकात प्रवाशी ज्या गावांचे वाढू लागले त्या गावी बस सोडण्यात येत आहे.

बाहेरील आगारातूनही बसेस आता हळुहळू वाढू लागल्या आहेत. एकूण बसफेर्‍या या 100 च्या वर गेल्या असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान धुळे, नाशिक यासह विदर्भातून येणार्‍या बसेसही आता वाढू लागल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या