एमपीएससीच्या परीक्षेला 1,456 परीक्षार्थींची दांडी

0
जळगाव । महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला 1 हजार 456 परीक्षार्थींनी दांडी मारली. जिल्ह्यातील 30 केंद्रावर सकाळी 10 ते 12 या वेळेत परीक्षा घेण्यात आली. बांभोरी जवळ अपघात झाला असल्याने काही परिक्षार्थी उशिरा परिक्षा केंद्रावर पोहचले.

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परीक्षेसाठी जिल्हाभरातील 9 हजार 550 परीक्षार्थी पात्र होते. सकाळी 10 ते 12 या वेळेत लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला 8 हजार 94 हजार परीक्षार्थी उपस्थित होते. तर 1 हजार 456 परीक्षार्थींनी परीक्षेला दांडी मारली. परीक्षेदरम्यान कोणताही अनूचित प्रकार घडू नये, तसेच परीक्षार्थींवर नजर ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनांकडून दोन भरारी पथके तयार करण्यात आली होती.

या भरारी पथकांची संपूर्ण परिक्षा केंद्रावर नजर होती. या परीक्षेसाठी 30 परीक्षाकेंद्रावर 110 पर्यवेक्षकांसह 430 समवेशकां नियुक्ती करण्यात आली होती. तसेच जिल्हा प्रशासनाकडून 8 समन्वयक अधिकारी देखील नियुक्त करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

*