Friday, April 26, 2024
Homeजळगावमोदींना विरोध करणार्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी – एकनाथराव खडसे

मोदींना विरोध करणार्‍यांना विधानपरिषदेची उमेदवारी – एकनाथराव खडसे

जळगाव – 

गेली 40-42 वर्ष मी भाजपसाठी काम करत आहे. पक्षवाढीसाठी निरपेक्षपणे काम केले. त्यामुळे साहजिकच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. परंतु, पक्षाने संधी दिली नाही. याची खंत आहे.

- Advertisement -

ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या. मोदी गो बॅक, असा ज्यांचा नारा होता, अशा राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप कोणत्या दिशेने जात आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या .

भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. या विषयावर प्रतिक्रिया देताना खडसेंनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून देत भाजपवर निशाणा साधला. खडसे बोलतांना म्हणाले की,

गेली चाळीस, बेचाळीस वर्ष मी एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे. या काळात अनेक चढउतार आम्ही पाहिले आहेत. भाजप कठीण प्रसंगात जात असताना आम्ही प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढीसाठी काम केले आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत असताना यावेळी मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो.

मला अपेक्षा होती की पक्षाकडून संधी दिली जाईल. पण दुर्दैवाने संधी मिळू शकली नाही. पक्षाने यावेळी तर नव्या लोकांना संधी दिली. आमची अपेक्षा होती की पक्षाने किमान जे एकनिष्ठ राहिले आहेत,

ज्यांनी पक्ष वाढीसाठी योगदान दिले आहे, अशा लोकांना संधी दिली असती तर मला अधिक आनंद झाला असता. मात्र, पक्षाने ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या. मोदी गो बॅकअसा ज्यांचा नारा होता, अशा लोकांना भाजपने उमेदवारी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या