पत्रा वाकवून फोडले मोबाईल रिपेअरींगचे दुकान

0
जळगाव । दि.28 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेसमोरील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या मोबाईल रिपेअरींग दुकानाचा वरील पत्रा वाकवून अज्ञात चोरटयांने 30 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शामाप्रसाद मुखर्जी उद्यानालगत असलेल्या कॉम्पलेक्समध्ये शेख नासिर शेख मंजुर यांच्या मालकीचे मोबाईल रिपेंअरींगचे दुकान आहे.

त्यांनी रात्री नेहमी प्रमाणे दि.27 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान चोरटयाने दुकानाच्या वरील बाजूचा पत्रा वाकवून दुकान प्रवेश करीत दुरुस्तीसाठी आलेले 20 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे 20 ते 25 मोबाईल, 10 हजार रुपये किंमतीचे मोबाईल चार्जर, हेडफोन, रिपेअरिंगचे स्पेअरपार्ट असा एकूण 30 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

सकाळी 10.30 वाजता शेजारील दुकानदाराच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी त्यांनी तात्काळ नसिर शेख यांना माहिती दिली. शेख यांनी दुकानावर आल्यानंतर दुकान उघडून पाहिले असता, दुकानात चोरी झाल्याचे समजले.घटनेची माहिती कळताच शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जावून घटनेची माहिती घेतली.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल, चार्जर, हेडफोन व रिपेअरींग साठी लागणारे स्पेअरपार्ट चोरून नेल्याप्रकरणी शहर पोलिसात नासिर शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सफौ. वासुदेव सोनवणे करीत आहे.
पत्रा वाकवून चोरीच्या घटना नेहमीच्या

शामाप्रसाद उद्यानालगत असलेल्या 8 ते 10 दुकानामध्ये आतापर्यंत चार-पाचवेळा पत्रा वाकवूनचे चोरीच्या घटना घडलेला असून घटनास्थळ शहर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे. दरम्यान यातील एकही घटना उघडकीस आलेली नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

 

LEAVE A REPLY

*