मतदारांचे नुतनीकरण न केल्याने मनसेची खंडपीठात याचिका

0
जळगाव । दि.22 । प्रतिनिधी-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विविध प्राधिकरणे गठीत करण्यासाठी निवडणुक प्रक्रिया सुरु करण्यात आली असून देखील पदवीधरांची नाव नोंदणी सुरु करण्यात आली आहे.
नियमाप्रमाणे जुन्या मतदारांचे नुतनीकरण करणे आवश्यक आहे. या उलट विद्यापीठ प्रशासनाने सन 2015 च्या नोंदणीकृत पदवीधरांची नोंदणी वैध ठरवून मतदारांचे नुतनीकरण न केल्याने मनसेचे जिल्हा सचिव अ‍ॅड. जमिल देशपांडे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठ निवडणुकीसाठी मतदार नोंदणी सुरु झाली आहे. विद्यापीठाने 2015 मध्ये 21 हजार 435 मतदारांची नोंदणी केली होती. दरम्यान 2015 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांना गृहीत धरले जाईल असे विद्यापीठांकडून सांगण्यात येत आहे.

सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 कलम 131 (5) अन्वये व विद्यापीठाच्या नियमानुसार त्यांना नुतनीकरण करावे लागणार आहे.

म्हणजे सर्वच पदवीधरांची नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे. 1 मार्च पासून विद्यापीठ कायदा अंमलात आलेला अ सून 2015 मध्ये नोंदणी केलेल्या पदवीधरांना नोंदणीमधून सुट देता येणार नाही.

त्यामुळे त्यांचे नुतणीकरण होणे आवश्यक आहे. दरम्यान 2015 मध्ये नोंदणीकृत पदवीधरांच्या यादीत नोंदणीसाठी व मतदार यादीत समावेशनासाठी अर्ज केलेले व वैध ठरविण्यात आलेल्या पदवीधरांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही असे विद्यापीठाने महाविद्यालयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

त्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले असल्याने सरकार, उमवि कुलगुरु, रजिस्टार, व निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याविरुध्द मनसेचे जमिल देशपांडे यांनी औरंगाबाद खंडपीठात 20794/2017 क्रमांकाची याचिका दाखल केली आहे.

दरम्यान सन 2015 मध्ये नोंदणी झालेली मतदारांची यादी बोगस असल्याने मनसेने याबाबत माहितीच्या अधिकारात नोंदणी झालेल्या मतदारांची यादी देण्यात यावी अशी मागणी केली होती.

अद्याप विद्यापीठ प्रशासन व निेवडणुक निर्णय अधिकारी यांनी मतदारांची यादी दिलेली नाही. तसेच मनसेचे जिल्हा सचिव यांनी मतदारांचे नुतनीकरण केल्याशिवाय निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येवू नये अशी मागणी देखील निवेदनाद्वारे केली होती. पत्रकार परिषदेवेळी अशफाक पिंजारी, संदिप मांडोळे उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

*