ना. गुलाबराव पाटलांचा एसटीतून प्रवास

0

जळगाव । राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीतून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाशांना नेहमी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने राज्य सहकार मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी ते जळगाव बसने प्रवास करीत बसधील प्रवाशांसह चालक, वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर बसस्थानकाची पाहणी देखील ना. पाटील यांनी केली.

राज्य परिवहन महामंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने राज्य सहकार मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पाळधी बस स्थानक ते जळगाव बस स्थानकापर्यंत लालपरीने प्रवास केला. दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास पाळधी बस स्थानकावर आले. यावेळी त्यांनी बस स्थानावर असलेल्या विद्यार्थी व प्रवाशांसोबत संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. दरम्यान अवघ्या काही वेळातच त्याठिकाणी जळगाव आगाराची (एमएच 20 बीझेड 3151) क्रमांकाची अमळनेर-जळगाव बस आल्याने ना. पाटील यांनी बसमध्ये बसून जळगावकडे येण्यास निघाले. याप्रसंगी त्यांच्यासोबत महानगराध्यक्ष शरद तायडे, मानसिंग सोनवणे, जनार्दन सपकाळे, रावसाहेब पाटील आदी उपस्थित होते. यावेळी ना. पाटील यांनी बसमधील प्रवासी, विद्यार्थी यांच्यासह चालक व वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत. या समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यानी यावेळी दिले.

विद्यार्थ्यांनी अडवली ना. पाटीलांची बस
बस जळगाव बस स्थानकावर आली असता. ना. पाटीलांची बस ही धरगाव तालुक्यातील धारशीरी येथील विद्यार्थ्यांनी अडवून त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी ना. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांचे लवकरात लवकर निरसण केले जाईल असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.

बस स्थानकातील प्रत्येक विभागांना दिली भेट
बसमधून प्रवास केल्यानंतर ना. गुलाबराव पाटील यांनी बस स्थानकातील कर्मचार्‍यांच्या विश्रामगृहासह इतर सर्व विभागांची पाहणी ना. पाटील यांनी केली. यावेळी कर्मचार्‍यांनी ना. पाटील यांच्याकडे समस्या मांडून तोडगा काढण्याची विनंती केली.

अधिकार्‍यांना दिली तंबी
दररोज एसटीने हजारे प्रवासी प्रवास करीत असतात. त्यांना दररोज अनेक समस्यांना समोरे जावे लागत असते. याबाबतची तक्रार महामंडळाच्या अधिकार्‍यांकडे केली असता. अधिकारी धुडकावून लावत असल्याची कैफियत काही विद्यार्थी व कर्मचार्‍यांनी ना. पाटील यांच्याकडे कथन केली. याचवेळी ना. पाटील संतप्त होत अधिकार्‍यांना फैलावर घेत अधिकार्‍यांनी सर्वांसोबत आदराने बोलत जा, त्यांच्या शंकांचे निरसण करणे तुमचे काम आहे असे सांगत तंबी दिली.

एअरपोर्टसाखर बसपोर्ट व्हाव- ना. पाटील
राज्यात 13 जिल्ह्यात बसपोर्टला मंजूरी मिळाली आहे. यामध्ये जळगावातील बस स्थानकाचा देखील समावेश आहे. बसपोर्टसाठी पहिल्या टप्प्यातील यादीत याची मंजूरी झालेली असून त्याचा निधी देखील मिळालेला आहे. तसेच दुसर्‍या टप्प्यातील यादी देखील परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांनी मंजूर केली असून त्याचा निधी देखील लवकरच मिळाणार आहे. त्यामुळे जळगावात एअरपोर्टसारख बस पोर्ट होण्यासाठी मी सर्व सामान्य नागरिकाप्रमाणे प्रवास केल्याची माहिती ना. पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

समस्या मांडणे म्हणजे पाप नाही
सर्व सामान्य जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत त्या मांडणे म्हणजे पाप नाही. आम्ही सरकार मध्ये आहोत म्हणून काय झाल. सरकार चुकत असेल तर त्यांना देखील बोललं पाहिजे. तरुणांकडेे आम्ही देशाचा आधारस्तंभ व महासत्ता म्हणून बघतो. त्यामुळे त्यांच्या समस्या मांडण्यासाठी मी सदैव तयार राहणार असल्याचेही ना. पाटील यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*