मेहरुणमधील तरुणाची हत्त्या

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-मेहरुण परिसरातील तरुणाची गळा चिरुन हत्या झाल्याची धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली. शिरसोली आकाशवाणी प्रसारण केंद्राजवळील जंगलात त्याचा मृतदेह आढळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेहरुण परिसरातील दत्तनगरमधील अशोक किराणाजवळील रहिवाशी नावेद शफीउद्दीन पिरजादे (वय18) या तरुणाचा मृतदेह शिरसोलीजवळील जंगलात आढळला.
धारदार शस्त्राने गळा चिरलेला तसेच कमरेच्यावर दोन ठिकाणी वार असल्याचे आढळून आले त्यामुळे त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला.

आकाशवाणी प्रसारण केंद्राजवळुन वळणार्‍या रस्त्यावर मृतदेह पाहण्यासाठी शिरसोली येथील नागरीकांनी गर्दी केली. मात्र उशिरापर्यंत त्याची ओळख पटली नव्हती.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दुपारी 12.27 वाजता मृतदेह सय्यदअली जावेद, शकील खान, समीर हमीफ खाटीक यांनी ओळखले. त्यांच्या सांगण्यावरुन नावेद यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बोलविण्यात आले असता वडील शफीकउद्दीन पिरजादे यांनी सिव्हील गाठत मृतदेह पाहताच आक्रोश केला.

सोरटच्या दुकानावर होता कामाला
बि.जे.मार्केटमध्ये शरीफ खान मोहम्मद खान यांच्या सरोटच्या दुकानावर तो गेल्या दोन वर्षापासुन कामाला होता. तसेच जाकीर भाई, पिंटु भाई, कैलास राजपूत यांच्याकडेही भंगाराच्या दुकानावरही कामाला असल्याची माहिती समोर येत आहे.

उपवास सोडल्यानंतर नावेद बेपत्ता
नावेद बि.जे.मार्केटमध्ये कामाला जातो असे सांगून घराबाहेर पडला. सायंकाळी रोजा उपवास सोडल्यानंतर त्याने तरावी पठण केले. यानंतर फातेमा मस्जिद येथे नमाज पठण केले. यानंतर सुमारे 9.30 वाजेच्या सुमारास नावेद बेपत्ता झाला. रात्रभर मुलाच्या मोबाईल फोन बंद येत असल्याने कुटूंबीयांनी रात्र काळजीतच काढली.

रुग्णालयात आक्रोश
नावेद याला तीन भाऊ व चार बहिणी आणि आई-वडील असा परिवार आहे. वडील शफीउद्दोनीन जमीजउद्दोनीन पिरजादे, आई शरीफाबानो, भाऊ जियाउ हक, नजीमउहक, जुणेद, बहीण शबानापरवीना, शबीना परवीना, शायना परवीना, शबनम परवीना असा परिवार आहे. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला होता.

रुग्णालयात गर्दी
मेहरुण परिसरातील तरुणाचा खून झाल्याची वार्ता कळताच परिसरातील अनेकांनी रुग्णालयात गर्दी केली. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी डीवायएसपी सचिन सांगळे, पोनि.सुनिल कुराळे, पोनि. सुनिल गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचार्‍यांनी सिव्हीलमध्ये होते.

शोधासाठी पथके तयार
नावेद याच्या मारेकर्‍यांच्या शोधासाठी डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुनिल कुर्‍हाडे यांच्या पथकातील गुन्हे शोध मधील कर्मचार्‍यांचे वेगवेगळे पथक तयार केले आहे. काही जणांची चौकशी देखील करण्यात आली आहे. दरम्यान सर्व शक्यतांवर गुन्ह्याचा तपास केला जात असून लवकरच संशयीतांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे डीवायएसपी सचिन सांगळे यांनी सांगितले.

 

 

 

LEAVE A REPLY

*