नावेदच्या खून प्रकरणाला प्रेमसंबधाची झालर

0
जळगाव । दि.21। प्रतिनिधी-मेहरुण परिसरातील नावेद पिरजादे यांच्या खूनप्रकरणी एमआयडीसी पोलीसांनी जाकीर याला अटक केली.
त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची दि.23 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, प्रेमसंबंधातुन खून झाल्याचे समोर येत आहे.
मेहरुण परिसरातील नावेद शकीबुद्दीन पिरजादे या तरुणाचा शिरसोलीजवळ गळ्या चिरुन खून करण्यात आला होता. नावेद याच्या शरीरावर धारदार शस्त्राने सात ठिकाणी वार करण्यात आल्याने खून खुन्नस असल्यानेच केला असावा असा प्राथमिक निष्कर्ष पोलीसांनी लावला होता.

दरम्यान, नावेद राहत असलेल्या परिसरातीलच एका मुलीशी त्याचे प्रेमसंबध असल्याचीही चर्चा होती. सोरट जुगाराच्या दुकानावर नावेद कामाला असल्याने त्यातुनही त्याच्यावर हल्ला करण्यात आला असावा अश्या शक्यतांवर पोलीस तपास करीत होते.

त्यातच खून, बलात्कार यासह गंभीर स्वरुपाचे 22 गुन्हे दाखल असलेल्या संशयीत आरोपी जाकीर खान याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडुन अद्यापही खूनाचे नेमके कारण उघडले नाही. मात्र प्रेमसंबधातुनच नावेदची हत्या करण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, जाकिर खान याला अटक करुन त्याला न्या. बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याची दि.23 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यावेळी सरकारपक्षातर्फे अ‍ॅड.तडवी यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

*