30 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-मेहरुणमधील दत्तनगरातील रहिवाशी असलेल्या नावेद अख्तर शकीबुद्दीन पिरजादे या तरुणाच्या खुनप्रकरणात तीन दिवस उलटूनही पोलिसांना कुठलेही धागेदारे मिळालेले नाही.
दरम्यान पोलिसांनी तिसर्‍या दिवशी मेहरुण ते शिरसोलीपर्यंतच्या 30 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असल्याचे समजते.

नावेदच्या खुनप्रकरणी पोलीस विविधांगी तपास करीत असून पोलिसांना कुठलाही ठोस पुरावा अद्याप सापडलेला नाही. पोलीस या खूनप्रकरणाचा कसून तपास करीत असून नातेवाईकांसह मित्रमंडळीची चौकशीदेखील करीत आहे.

डीवायएसपी दुसर्‍या गुन्हाकामी बाहेरगावी असल्याने या गुन्हात काही संशयितांची चौकशी झालेली नव्हती. दरम्यान पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु होते.

खुनाच्या गुन्ह्याचा तपास लागेना
तालुक्यातील भादली येथील चौघांच्या हत्त्येप्रकरणी दोन महिने उलटूनदेखील काही सुगावा लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी गांधी बगिचात बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.

तसेच शिरसोलीजवळील शामाफायर वर्क्सजवळदेखील जंगलात एकाचा संशयास्पद मृतदेह मिळून आला होता. या प्रकरणाचादेखील अद्याप तपास लागलेला नसून पोलिस खुनाच्या गुन्हाच्या तपासात असमर्थ ठरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*