तांबापूरातील हाणामारी ; आठ जणांना अटक

0
जळगाव । दि.16 । प्रतिनिधी – तांबापुरातील मस्जीदमधील व्यवहाराच्या वादातून दोन गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना दि.15 रोजी रात्री घडली होती. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात परस्परांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान संशयितांना न्या.गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
तांबापुरातील मदीना चौकात अवलीया मस्जीद आहे.

यामध्ये हनिफ शहा ट्रस्टी असून लुकमान आणि फिरोज अजीज खान यांनी मशिदीतील येणार्‍या देणगीबाबत ट्रस्टींना विचारणा केली होती.

फिरोज खान हे दि.15 रोजी रात्री रोजा सोडल्यानंतर नमाज पठाणासाठी आला असता, हनीफ शहा यांच्यासह शरीफ शहा, एजाज शहा, शाहीद शहा , तौसिफ शहा यांच्यासह 20 ते 25 जणांनी फिरोजला मारहाण केली.

यावेळी फिरोजचा भाऊ वसीम खान व भाचा याला देखील जमावाने मारहाण केली. या मारहाणीच्या वादातून खान -शहा गट समोरासमोर आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

यावेळी डीवायएसपी सचिन सांगळे, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे, यांच्यासह अधिकारी कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते.

या हाणामारी प्रकरणी फिरोज खान, वसीम खान व रोशन खान हे तिघे जखमी झाले आहे. एमआयडीसी पोलिसात रोशन खान यांच्या फिर्यादीवरून एजाज शहा, शरीफ शहा, शाहीद शहा, तौसिफ शहा रा. सर्व अवलीया मस्जीद तांबापुरा यांच्या विरुध्द भादवी कलम 143, 147, 149, 323, 324, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या गुन्हात शरीफ शहा हनिफ शहा यांच्या फिर्यादीवरून रोशन खान, शब्बीर खान, वसीम खान, शेख लुकमान शेख बाबू रा. सर्व फुकटपुरा यांच्या विरुध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनि बागुल करीत आहे.

दरम्यान दुसर्‍या दिवशी परिसरात शांतता असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. दरम्यान संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी देण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.के.एफ.तडवी यांनी कामकाज पाहिले.

 

LEAVE A REPLY

*