बाजारपेठेत ग्राहकांना डिस्काऊंटचे आकर्षण

0

जळगाव । दि.29 । प्रतिनिधी-1 जुलै पासून शासनाने जीएसटी ही पारदर्शी नविन करप्रणाली लागू करणार आहे. जीएसटीच्या संभ्रमामुळे बाजारपेठेत स्टॉक असलेला माल विक्रीसाठी दुकानदारांकडून डिस्काऊंटचे आकर्षण दिले जात आहे.

त्यामुळे सर्वच वस्तूंवर विविध प्रकारच्या डिस्काऊंट देवून दुकानदार ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षीत करीत आहे.
शासनाने सद्यस्थितीत असलेली सर्व करप्रणाली रद्द करून एकाच प्रकारचा कर आकारण्यासाठी जीएसटी ही पारदर्शी कर प्रणाली दि. 1 जूलै पासून लागू करणार आहे.

ही करप्रणाची अंमलबजावणी होण्यासाठी अवघा 24 तासांचा कालावधी शिल्लक राहीलेला आहे. जीएसटीची अंमलबजावणी लागू होत असतांना शहरातील व्यापार्‍यांमध्ये याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

तसेच जीएसटी लागू झाल्यानंतर बाजारपेठेत काय परिस्थिती निर्माण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तसेच व्यापार्‍यांनी साठवून ठेवलेला मालाची जीएसटी लागू होण्याच्या आधी त्याची विक्री करण्यासाठी दुकानदारांकडून विविध डिस्काऊंटचे आकर्षण दिले जात असल्याने बाजारांत ऑफर्सचा पाऊस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ऑनलाईन खरेदीसाठी ऑफर्सचा पाऊस
पूर्वीची कर प्रणाली रद्द करुन नवीन करप्रणाली लागू होत असल्याने ग्रहाकांनी वस्तूंची खरेदीकरावी यासाठी कंपन्यांकडून ग्रहाकांसाठी 10 ते 50 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देवून ऑफर्सचा पाऊस पाडत आहे.

जीएसटीमुळे व्यापार्‍यांमध्ये संभ्रम
शासनाच्या आदेशानुसार 1 जुलै पासून जीएसटी ही कर प्रणाली लागू होणार आहे. ही कर प्रणाली लागू झाल्यानंतर कोणत्या वस्तूंचे दर कमी होतील आणि कोणत्या वस्तूंचे दर वाढतील याबाबत साशंकता असल्याने व्यापार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बाजारपेठेत मंदिचे सावट
नवीन करप्रणाली जो पर्यंत लागू होणार नाही. तो पर्यंत घाऊक व्यापारी मालाची खरेदी करीत नसल्याचे व्यापर्‍यांकडून सांगीतले जात आहे. तसेच व्यापार्‍यांकडे असलेला माल विकण्यासाठी व्यापार्‍यांकडून विविध प्रकारची ऑफ दिली जात आहे. परंतू जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूचे भाव कमी होतील या आशेने ग्राहक देखील वस्तूंची खरेदी करीत नसल्याने बाजारात मंदिचे सावट निर्माण झाले असल्याची प्रतिक्रीया व्यापर्‍यांकडून व्यक्त होत आहे.

 

LEAVE A REPLY

*