Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

ममुराबादकडे जाणारा पर्यायी मार्ग बंद!

Share
जळगाव । शिवाजी नगरचा उड्डाणपुल तुटल्यानंतर त्याला पर्यायी मार्ग म्हणून शनीपेठकडून जूना मार्ग होता. मात्र उड्डाणपुल तोडण्या आधीच महानगरपालिकेने लेंडी नाल्यावरील पुल अर्धवट तोडून ठेवला असल्याने त्या परिसरातील नागरिकांची चांगलीच पंचायीत होत आहे. तसेच पर्यायी मार्ग म्हणून असलेला लेंडी नाल्यावरील पुल देखील तोडून ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेचे ढिसाळ नियोजनाबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शिवाजी नगराच्या उड्डाणपुल कालबाह्य झाला असल्याने या पुलाच्या कामाला पुढच्या महिन्या पासून प्रारंभ केला जाणार आहे. याठिकाणाहून होणारी वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे प्रशासनाने शनीपेठकडून ममुराबादकडे जाणार पर्यायी मार्ग म्हणून त्याचा वापर करावा असे सांगितले होते. मात्र शिवाजीनगर उड्डाणपुल तोडण्याआधीच महापालिकेने शनीपेठमधील लेंडीनाल्यावरील पुल तोडला आहे. शिवाजीनगरकडे जाण्यासाठी असलेला हा पर्यायी मार्ग देखील त्यांच्याकडून बंद करण्यात आला असल्याने महापालिकेचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे.

महिनाभरापूर्वीच तोडला अर्धवट पूल
लेंडी नाल्यावरील पुल 25 कोटीच्या कामात मंजूर झाला आहे. या पुलाच्या कामाला महिन्याभरापूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. हा पुल देखील ब्रिटीशकालीन असून तो जेसीबीच्या सहाय्याने तोडण्याचे काम सुरु होते. आठ दिवसात हा पुलाची एक बाजू तोडण्यात आली असून ते काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. अर्धवट तोडलेल्या पुलामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

अद्याप केवळ खोलीकरणाचे काम पूर्ण
शिवाजीनगरच्या पुलाला पर्यायी मार्ग म्हणून रेल्वे प्रशासनाने लेंडी नाल्याच्या पुलाचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच पुलावरुन तिसर्‍या व चौथ्या रेल्वेलाईनसाठी दोन लहान पुल तयार करण्याचे काम देखील सुरु आहे. हे काम तीन महिन्यातच पुर्ण करणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले होते. मात्र तीन महिने केवळ खोलीकरणाचे काम पुर्ण झाले असून रेल्वेलाईनच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी अजून दोन तीन महिने लागणार आहे.

पर्यायी असलेला पूल का तोडला?
शिवाजीनगराचा पुल तोडल्यानंतर ममुराबादकडून येणारी वाहतुक सर्व शनीमंदिराकडून वळविण्यात येणार होती. मात्र शनिमंदिराकडे जाणाराच पुलाचे बांधकामाला आत्ताच का मुहूर्त मिळाला. तसेच याबाबत मनपा अधिकार्‍यांकडून नियोजनावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

…तर जबाबदार कोण?
ा महापालिका प्रशासनाकडून लेंडी नाल्यावरील पुल अर्धवट रित्या तोडून ठेवला आहे. याठिकाणी सांडपाणी व घाण मोठ्या प्रमाणात साचून नागरिकांचे आरोगय धोक्यात आहे आहे. तसेच अर्धवट पुलामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच या पुलावरुन नागरिकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत असल्याने मोठी दुर्घटना होवू शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!