Type to search

Featured जळगाव

video जळगाव : माहेश्वरी सभा जळगावचा ‘आनंद मेळावा’ उत्साहात

Share

आ.सुरेश भोळे यांनी घेतला मेळाव्याचा आनंद

जळगाव

येथील अयोध्यानगर श्रीराम मंदिर परिसरात अयोध्या नगर एम. आय.डी.सी. व परिसर माहेश्वरी सभा जळगाव तर्फे आयोजीत ‘आनंद मेळावा’ उत्साहात पार पडला. या मेळाव्यास आ.सुरेश भोळे यांचेसह महानगरपालिका पदाधिकार्‍यांची उपस्थिती लाभली.

दरवर्षी प्रमाणे दि.19 जानेवारी रोजी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा आनंदोत्सव सुरू होता. या मेळाव्याला शहरातील सर्व समाजातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत खरेदीचा आंनद लुटला.

आनंद मेळाव्याचे उदघाटन गणपतलाल हिरालाल हेडा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जळगाव महानगरपालीकेचे पदाधिकारी यांचेसह समाजातील अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. मेळाव्यात खाद्यपदार्थांसह संसारोपयोगी वस्तू तसेच मनोरंजन खेळ, दागीने यांचे 51 स्टॉल लावले होते.

यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, चायनीज पदार्थ, स्टेशनरी, कटलरी, ज्वेलरीची दुकाने, होजिअरी, सौंदर्य प्रसाधने आदी स्टॉलवर अल्प दरात संसारोपयोगी व दैनंदिन लागणारे विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून महिलांसाठी मुक्त बाजारपेठ म्हणून एकदिवसीय आंनद मेळा भरवला होता.

यात सर्व स्तरातील सर्व समाजाच्या हजारो नागरीकांनी  मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. यावेळी विविध वस्तूंचे प्रदर्शन व सुलभ विक्री करण्यात आली. विक्रेत्यांनाही नफा मिळाल्याने रोजगार कसा करावा व स्वकष्टाची कमाई कशी करावी याचे ज्ञान व अनुभव महिलांना मिळाले. यामुळे महिलांना स्फुर्ती मिळून आत्मविश्वास बळावल्याची भावना महिलांनी बोलून दाखविली. ज्या स्टॉलधारकाचा सर्व माल पहिल्यांदा विक्री झाला त्या स्टॉलधारकास बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच मनोरंजन म्हणून आनंद मेळावा आयोजकांतर्फे नाममात्र दरात ना नफा ना तोटा या तत्वावर लकी ड्रॉ काढून मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वाटप केले. यात अनेकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

यशस्वीतेसाठी सुनील काबरा, दिपक हेडा, सुर्यकांत लाहोटी, नितीन काबरा, सुरेश मंडोरा, नंदलाल बिर्ला, योगेश धुत, विनय बाहेती, दिपक लढ्ढा, राजेंद्र बिर्ला, संजय चितलांगे, तेजस देपुरा, राकेश लढ्ढा, ओमप्रकाश जेथलीया, शंकर इंदाणी, प्रमोदकुमार हेडा, निलेश झंवर, अरूण लाहोटी, सत्यनारायण गग्गड, अतुल लखोटीया, राजेश लढ्ढा आदी पदाधिकार्‍यांसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!