मोंढाळे येथे लाच घेतांना वायरमनला अटक

0
पारोळा । दि. 16। प्रतिनिधी – तालुक्यातील मोंढाळे प्र.उ. येथील तक्रारदाराच्या शेतातील विज कनेक्शन संदर्भात कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून 2600 रुपयाची लाच घेतांना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकांनी अटक केल्याची घटना घडली.
यातील तक्ररदार हे शेती करण्यासाठी बाजुचे शेतातील इलेक्ट्रीक पोलवरुन विज घेवून तक्रारदार यांचे विहीरीतील इलेक्ट्रीक मोटारने शेतात पाणी भरतात.
लोकसेवक गितकुमार शिरसाठ, विद्युत सहाय्यक-मोंढाळे प्र.उ. ता.पारोळा यांनी तक्रारदार यांचे शेतात येवून तक्रारदार यांचे व त्यांचे चुलत भाऊ यांचे शेतातील इलेक्ट्रीक पोलवरील विज कनेक्शनच्या वायरी काढुन घेवून गेले व विज कनेक्शन संदर्भात कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार व त्यांचे चुलत भाऊ यांचेकडून प्रत्येकी 1,300/- रु असे एकुण 2,600/- रु लाच मांगीतली होती व 2,600/- रु लाच न दिल्यास तक्रारदार व त्यांचे चुलत भाऊ यांचेवर विज कनेक्शन संदर्भात कारवाई करेल अशी धमकी दिली होती.

त्यामुळे तक्रारदार यांनी दि. 13 जून रोजी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, धुळे येथे लेखी तक्रार दिली होती.

त्यानुसार दि. 14 जून रोजी मोंढाळे गावात पडताळणी केली असता, वायमरन गितकुमार शिरसाठ यांनी तक्रारदार यांचेकडे 2,600 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर दि. 16 रोजी मोंढाळे येथील बस स्टॉप जवळ सापळा लावण्यात आला असता, वायमरन गितकुमार शिरसाठ यांना तक्रारदार यांचेकडून 2,600 रुपयाची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, नाशिक व पोलीस उप अधिक्षक शत्रुघ्न माळी, अ‍ॅन्टी करप्शन धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर, पोलीस निरीक्षक, पी.पी. देसले व त्यांचे पथकातील संदीप सरग, देवेंद्र वेन्दे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सतिष जावरे, जितेंद्र परदेशी, किरण साळी, कैलास शिरसाठ, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकुर, प्रकाश सोनार व प्रशांत चौधरी व संदीप कदम यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*