Type to search

आवर्जून वाचाच जळगाव

जळगाव : महावितरण यंत्रचालक संघटना पदाधिकार्‍यांचा स्नेह मेळावा

Share

जळगाव, धुळे, नंदुरबार मंडळातील यंत्रचालकांची उपस्थिती

जळगाव । प्रतिनिधी

जळगाव शहरातील शकुंतला माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात नुकताच पगारवाढीनंतर प्रथमच समस्त महावितरण यंत्रचालकांच्या वतीने आणि सर्व संघटना पदाधिकारी यांच्या विद्यमाने जळगाव, धुळे आणि नंदुरबार मंडळातील कार्यरत समस्त यंत्रचालकांचा स्नेहसेमळावा, खुले चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

महावितरण कंपनीच्या यंत्रचालकांचा स्नेहमेळाव्यास सर्व संघटनेतील यंत्रचालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटना वाद बाजूला ठेवून समस्त यंत्रचालक बांधवांवर आतापर्यंत झालेला अन्याय कायम स्वरुपी कसा दूर करता येईल यासाठी प्रथमच जळगावात यंत्रचालक बांधव एकत्र आले होते.

मेळाव्यात राजेश आर.चौधरी वरिष्ठ यंत्रचालक महावितरण यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, समस्त यंत्रचालक संवंर्गातील कर्मचार्यांचे सन 2005 च्या पुर्वी व एमएसइबी चे कंपनीकरण झाल्यानंतर आजतागायत झालेली यंत्रचालकांची पारेषण-वितरण मधील वेतन तफावत सातत्याने वाढतच आहे यात शंका नाही. याकरीता महावितरण कंपनीच्या कार्यरत समस्त प्रधान यंत्रचालकांना कनिष्ठ अभियंता (दुय्यम अभियंता) पदाची वेतनश्रेणी लागू करावी जेणेकरून यंत्रचालकांचे 13 वर्षांपासून झालेले आर्थिक नुकसान भरून निघण्यास मदत होईल.

यंत्रचालक संवंर्गाला पुर्वीप्रमाणे सन 2005

च्या कंपनीकरण झाले पासून जर कनिष्ठ अभियंता पदाची उच्च वेतन श्रेणी लागु झाली असती तर 13 वर्षांपर्यंत यंत्रचालक संवंर्गास याचा निश्चितच फायदा झाला असता, परंतु असे झालेच नाही. तरी महावितरण प्रशासनास संघटने मार्फत मानवता व यंत्रचालकांचा हक्क समजून समस्त यंत्रचालकांची वेतन तफावत दूर करून उच्च वेतन श्रेणी मिळवून द्यावी अशी सर्व संघटना पदाधिकारींच्या वतीने हाक दिली आहे, असे येथील  त्रचालकांच्या मेळाव्यात आर.आर.चौधरींनी स्पष्ट केले आहे. या चर्चासत्रात विशेष उपस्थिती म्हणून हभप नवनाथ पवार (महाराज), आर.आर.सावकारे, आर.आर.पाटील, प्रदिप पाटील, सादिक शेख, सुनिल भोळे, राजेश बडनखे, रामनाथ नागरगोजे, विकास सोनवणे, तुषार पाटील,अनिल पाटील, जगदिश भोळे, गोपाल विसपुते, काशिनाथ जयकर सह विविध विभागातील यंत्रचालकांची उपस्थिती होती.

आभार हिरालाल पाटील (यंत्रचालक, पाळधी) यांनी मानले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!