…तर पाच वर्ष पदोन्नती रोखणार – जानवीर

0
जळगाव । दि.3 । प्रतिनिधी-जिल्ह्यात वीज चोरीवर आळा घालण्याचे आदेश देवूनही अधिकारी वीज चोरी रोखण्यात अपयशी ठरत आहे.
वीज चोरी होत असलेल्या भागात बाहेरील पथकाकडून कारवाई करण्यात येवून जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांची पदोन्नती पाच वर्षांसाठी रोखण्यात येणार असल्याचा सुचक इशारा बी.के. जनवीर यांनी दिला.
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या जिल्हा कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी म.रा.वि.तांत्रिक कामगार संघटनेचे एन.के.मगर होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून डी. आर. बनसोडे, ए.एस. साळुंके,राजेंद्र म्हकाळे, डी.के.मोहोळ, एस. ए. तडवी, पी.ए.सोरटे, एन.डी.नारायणे, एस.जी. मोरे, अरुण शेलकर, आर.के.वैद्यकर, उध्दव कडवे, किशोर खोबरे उपस्थि होते.

त्यानंतर अधिक्षक अभियंता बनसोडे म्हणाले की, वीज अधिकारी व कर्मचार्‍यांचे अपघात होत असून यापासून बचाव करण्यासाठी ठोस पाऊले उचलणार आहे.

तसेेच कर्म चार्‍यांना साहित्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. वीज तांत्रिक कामगार संघटनेत 15 अभियंत्यासह 48 कर्मचार्‍यांनी प्रेवश केला.

यामध्ये अभियंता सुरेश पांचगे, चेतन तायडे, कुणाल महाजन, उमेश घुगे, आर.टी.सपकाळे, विक्रांत सिंग, प्राजक्ता राठोड, निलेश ओतारी, सागर कागणे, अनिल सोनवणे आदींचा समावेश आहे.

 

LEAVE A REPLY

*