महाराष्ट्र एक्सप्रेसला चार तास विलंब; प्रवासी ताटकळले

0
जळगाव । मध्य रेल्वेमार्गावर अगदी अचूक वेळेवर नियमित धावणारी 11039 डाउन कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सपे्रस रविवार 14 रोजी एक किंवा दोन नव्हेतर चक्क 4 तास विलंबाने जळगाव स्थानकावर आली.

मुंबई ते नागपूर तसेच मध्य, उत्तर भारतात जाणार्‍या अनेक प्रवासी गाडया लोहमार्ग दुरूस्ती वा अनेक तांत्रिक कारणास्तव सद्यस्थितीत नेहमीच विलंबाने धावत असतात. प्रसंगी भुसावळ ते नागपूरसह मुंबईकडे जाणार्‍या पॅसेंजर गाडया रद्द देखिल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आरक्षण तिकीटे घेवून प्रवास करणार्‍या प्रवाशांसह नियमित नोकरी व्यवसायानिमित्त दैनंदिन ये-जा करणार्‍या प्रवाशांना याचा मोठया प्रमाणावर आर्थिक तसेच मानसिक नुकसान सहन करावे लागत आहे.

जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी बहुतांश शाळांचे शैक्षणिक सत्र संपून उन्हाळयाच्या सुट्या लागल्या आहेत. सर्वच प्रवासी गाडयांना गर्दी असून नियमित प्रवासी या गर्दीला मोठया मुश्किलीने तोंड देत प्रवास करतात. अशा ऐन गर्दीच्या वेळी रविवार 14 एप्रिल रोजी शिरसोली रेल्वेस्थानकावरच लोहमार्ग दुरूस्ती च्या कामामुळे कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुमारे चार साडेचार तास विलंबाने जळगांव स्थानकावर आली.

LEAVE A REPLY

*