महाराष्ट्र बँक कॉलनीत ‘वेस्ट टू कम्पोस्ट’ उपक्रम

0
जळगाव । दि.26 । प्रतिनिधी-निर्माल्य ठिकठिकाणी टाकून दिल्यामुळे निर्माल्य सडून आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
त्यामुळे निर्माल्याचे पावित्र राखण्यासाठी आणि आरोग्याची समस्या लक्षात घेवून नगरसेविका अश्विनी देशमुख यांच्या संकल्पेनतून व संजय पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळमधील महाराष्ट्र बँक कॉलनी ‘वेस्ट टू कम्पोस्ट’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

‘वेस्ट टू कम्पोस्ट’ उपक्रमासाठी 4 फूट खोल, 6 फूट रुंद असा खड्डा तयार करण्यात आला. या खड्ड्यात निर्माल्य, वाळलेली झाडांची पाने संकलित करून ती देखिल प्रकल्पांतर्गत वापरली गेली.

90 दिवसात या प्रकल्पात जवळपास दीड टन कम्पोस्ट तयार झाले. दरम्यान, विनोद देशमुख, नगरसेविका अश्विनी देशमुख, संजय पावडे यांच्या हस्ते कॉलनीतील रहिवासियांना वाटप करण्यात आले.

यशस्वीतेसाठी मुकुंद धजेकर, श्रीरंग कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, प्रसाद शिरवाडकर, सूरज पाटील, शांतिलाल पाटील, सुभाष वडोदकर, पूनम खानदे, हर्षदा कुलकर्णी, हेमांगी पावडे, कामाक्षी चनावार, संगीता धजेकर, शुभदा कासखेडीकर, मोनाली वाडेकर, सुनिता महाजन, किर्ती वाबळे, शैला चौधरी यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*