गोलाणीतील अनाधिकृत जाहिरात फलके जप्त

सभापतींच्या पाहणी नंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

0
जळगाव । महापालिकेच्या स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी मंगळवारी पाहणी केल्यानंतर प्रशासनाने तातडीने बुधवारी गोलाणी मार्केटमधील अनाधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात आली. यासह ड्रेनेज पाईप दुरूस्तीचे कामसह स्वच्छतेच्या कामेही हाती घेण्यात आली आहे. दुसर्‍या दिवशीही कारवाई सुरू राहिल, असे मराठे यांनी सांगितले.

बुधवारी पंधरा ते वीस होर्डींग काढून महापालिकेत जमा करण्यात आले. दुपारी 12 वाजेच्या सुमारास मनपाचे पथक गोलाणी मार्केटमध्ये पोहचले. यावेळी अनेक दुकानांची अनाधिकृत बॅनर्स हटविण्यात आली. काही दुकानदार हे अनाधिकृत बॅनर लावत असल्याने महापालिकेला कर भरत नसल्याचे समोर आले आहे.

किरकोळ वसुली विभागाचे नरेंद्र चौधरी व अतिक्रमण विभागाचे एच. एम. खान हे गोलाणी मार्केटमध्ये ज्यांचे बॅनर अतिक्रमीत आहेत अशा दुकांनदारांना प्रत्यक्ष पहाणी करून त्यांचे त्याचे फोटो काढून नोटीस बजाविण्यात येणार आहे. दरम्यान असे बॅनर लावण्यासाठी अतिक्रमण विभागाची परवानगी लागणार आहे.

LEAVE A REPLY

*