Type to search

जळगाव

गिरणा पंपिंगवर साकारणार अद्ययावत वॉटर पार्क

Share

जळगाव । शहरातील साधारणत: 4 एकरावरील गिरणा पंपिंग स्टेशनवर अद्ययावत असा वॉटर पार्क साकारण्यात येणार असून 11 ते 12 कोटीपर्यंत या पार्कला खर्च येणार असून उद्यापासूनच या कामास प्रारंभ करण्यात येणार आहे. या पार्कसाठी जागेची पाहणी स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी दि.19 रोजी सकाळी 11 वा. केली. पार्कचे आर्किटेक्चर किशोर पाटील, मनपा बांधकाम शहर अभियंता एस. एस. भोळे, पाणी पुरवठा सभापती डी. एस. खडके आदी यावेळी उपस्थित होते.

अद्ययावत पर्यटनस्थळ
वॉटर पार्क ला 11 ते 12 कोटीपयर्ंत खर्च अपेक्षित असून लवकरच डीपीआर काढण्यात येईल. त्यानंतर महिन्याभरात पार्कच्या कामास सुरूवात होईल. दोन महिन्यात हा पार्क साकारण्यात येईल. साधारणत: निवडणूकपूर्वी वॉटर पार्कच्या कामास सुरवात होईल. अद्ययावत असे पर्यटनस्थळ साकारले जाईल. यात स्विमिंग पूल, स्विमिंग टँक, मुलांना पाण्यात खेळण्यासाठी सुविधा, पाण्याखाली उभे राहून आनंद घेता येईल,अशी सुविधा, रेस्ट हाऊस, अद्ययावत रस्ते तयार करण्यात येईल. तसेच मनोरंजनासाठी येथे प्रोजेक्टद्वारे पार्कबद्दल माहिती देण्यात येईल. म्युझियमसुध्दा येथे साकारले जाईल. तसेच येथे असलेले महादेवाचे मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येईल.

प्रस्ताव पाठवण्याबाबत शासनाचे पत्र
8सभापती जितेंद्र मराठे यांनी या कामाबाबत सतत पाठपुरावा केलेला होता. नुकतेच जिल्हाधिकार्‍यांकडेही पत्र पाठवले होते. जिल्हाधिकार्‍यांनी पर्यटन मंत्रालयाकडे ते पत्र पाठवले त्यानंतर पर्यटन मंत्रालयाने तात्काळ प्रस्ताव पाठवण्याचे पत्राद्वारे कळविले होते.

तत्पूर्वी स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी पर्यटन मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केल्याचे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवा, असे आवाहन केल्याने त्यानुसार 11 ते 12 कोटी या कामास खर्च येणार असून डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने अद्ययावत वॉटर पार्कचे काम येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यात येणार असून या पार्कसंबंधी आपण 4 ते 6 महिन्यापासून पाठपुरावा करीत आहोत. जेणेकरुन शहरातील नागरिक, लहान बालगोपाळांना खेळण्या बागडण्यास एक उपयुक्त असे दालन मिळेल, एक सुसज्ज असे पर्यटन स्थळ येथे साकारले जाणार असून याकामी मी अंदाजित 40 कोटीपर्यंतची मागणी केली आहे. हा पार्क 11 ते 12 कोटीपर्यतचा खर्च अपेक्षित आहे. अजून निधी मिळाल्यास पाण्यामध्ये बोटी चालतील, असा प्रकल्प साकारू.
– जितेंद्र मराठे, मनपा स्थायी सभापती

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!