Type to search

महापालिका शहरात लावणार एक लाख वृक्ष

maharashtra जळगाव

महापालिका शहरात लावणार एक लाख वृक्ष

Share
जळगाव । मनपातर्फे 1 लाख वृक्ष लागवडीचा व त्यांचा संगोपनाचा संकल्प महानगरपालिकेतर्फे केला जात असून जागतिक पर्यावरण दिनी 5 जून रोजी बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, असे सभापती जितेंद्र मराठे यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

झाडांचे संरक्षण व संगोपनासाठी ट्री गार्ड उपलब्ध करुन संगोपन सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहभागाने झाडे जगण्याचे प्रमाणात वाढ होईल, पावसाळ्यापूर्वीच ही कामे करावयाची असून याबाबत पर्यावरण अधिकारी योगेश वाणी यांचेसोबत सभापती मराठे यांनी नुकतीच एक बैठक घेतली.

बैठकीत महत्वपूर्ण चर्चा
जास्तीत जास्त ट्री गार्ड वृक्षसंरक्षणासाठी उपलब्ध करावेत, यासाठी सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये, विविध शाळा, बँका, व्यापारी, डाक्टर, प्रतिष्ठीत व्यक्ती, राजकीय पदाधिकारी यांनाही 5 रोजीच्या बैठकीत बोलाविण्यात येत आहे. शहरातील डिव्हाइडरमध्ये बोगनवेली लावणेसंबंध व संगोपन करणेसाठी विविध सामाजिक संथा यांना बीओटी तत्वावर जाहीर करण्यात येत आहे. विविध ठिकाणच्या खुल्या जागा, रस्त्याच्या दुतर्फा, शासकीय कार्यालये, शैक्षणिक व सामाजिक संस्था आदी खुल्या जागा पाहून 1 लाख वृक्ष लागवड करण्यात येईल, स्वत:च्या जागेत मोफत वृ पुरवणेबाबत कार्यवाही करण्यात आहे. मनपास 2 ते 3 फूट उंच वृक्ष पुरविण्याबाबत विनंती करण्यात आली तसेच रस्त्याच्या दुतर्फा 4 ते 5 फूट उंच झाडे लावण्यात येणार असून ही रोपे मेहरुण शिवाजी उद्यान व वनिकरण विभागातून मिळावे असेही ठरविण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!