Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

जळगाव मनपाचे मजले अनधिकृत असतील तर पाडा!

Share
जळगाव । महानगरपालिकेची 17 मजली इमारत शहराचे वैभव आहे. आ.राजूमामा भोळे यांना या इमारतीतील काही मजले अनधिकृत आहेत असे वाटत असेल तर त्यांनी महापौरांना पत्र देवून महासभेत ठराव करावा. आणि अनधिकृत असलेले मजले पाडून दाखवावे, असे आव्हान शिवसेनेचे नेते नितीन लढ्ढा यांनी आ.राजूमामा भोळे यांना पत्रकार परिषदेत दिले.

महानगरपालिका इमारतीचे काही मजले बेकायदेशीर आहे. आयुक्तांनी ते मजले आधी पाडावे, आणि नंतर इतरांचे अतिक्रमण काढावे, असे विधान आ.राजूमामा भोळे यांनी गुरुवारी केले. या विधानावर प्रतीउत्तर म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेवून आ.भोळे यांच्या विधानावर चांगलाच समाचार घेतला. पत्रकार परिषदेत बोलतांना नितीन लढ्ढा म्हणाले की, आ.राजूमामा भोळे यांचा अभ्यास कच्चा असल्याने ते बालिशपणाचे वक्तव्य करतात. आ.भोळे यांनी यापूर्वी देखील विधानसभेत दोन-तीन वेळा प्रश्न उपस्थित केला होता.

राजूमामा हे सत्ताधारी भाजपाचे आमदार आहेत. राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता आहे. जर खरंच महापालिका इमारतीचे मजले अनधिकृत असते तर राज्यशासनाने मनपा इमारतीचे मजले पाडण्याची भूमिका घेतली नसती का? असा सवाल उपस्थित करुन तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री डॉ.इसाक जामखानवाला यांनी जी.बी.महाजन यांनी केलेल्या तक्रारीवर निवाडा करतांना दि.3 ऑगस्ट 1989 मध्ये इमारतीचे मजले कायदेशीर असल्याचे मान्य केले असल्याची माहिती लढ्ढा यांनी दिली. पत्रकार परिषदेत मनपाविरोधी पक्षनेते सुनिल महाजन, विष्णू भंगाळे, बंटी जोशी, नितीन बरडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे उपस्थित होते.

खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे!
प्रशासन व सत्ताधारी भाजप यांची मिलीभगत आहे. ते प्रभाग क्र.5 मध्येच अतिक्रमणाची कारवाई करत आहेत. रिंगरोडवर कारवाई सुरु असतांना आ.भोळे यांनी हस्तक्षेप करुन कारवाई थांबविली. तर मग आता त्यांनी कारवाई का थांबविली नाही? सामान्य जनतेसमोर ते केवळ आकांडतांडव करित असून आा.भोळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टिका लढ्ढा यांनी केले.

नाव जाहीर करा अथवा राजीनामा द्या!
भूसंपादनाच्या विषयात काही सत्ताधारी सामील असल्याचे विधान आ.राजूमामा भोळे यांनी केले आहे. यावर बंटी जोशी यांनी नाव जाहीर करावे, अशी मागणी केली. तर सत्ताधारी पदाधिकार्‍यांचे नाव जाहीर करा, अथवा राजीनामा द्यावा, असे आव्हान मनपाविरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी आ.भोळे यांना दिले.

दुकानदारांना पर्यायी जागा द्यावी!
कोर्टचौक आणि तहसीलदार कार्यालयाजवळील दुकाने तोडण्यात आली आहेत. प्रशासनाने त्यांना पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी देखील शिवसेनेच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केली.

आ.भोळे यांची भूमिका दुटप्पी
महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर चार महिने उलटलवूनही ठोस काम केलेले नाही. महापालिकेचे मजले एकीकडे अनधिकृत असल्याचे विधान करायचे आणि दुसरीकडे हेच मजले भाडे तत्वावर देण्यासंदर्भात विचार मांडायचे अशी दुटप्पी भूमिका आ.भोळेंची असल्याची टिका लढ्ढा यांनी केले. मनपाचे काही मजले भाडे तत्वावर देवून तीची सुरक्षीतता धोक्यात आणणे, चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!