Type to search

Breaking News जळगाव

जळगाव : महामार्गावरील खड्ड्यांनी घेतला बळी ; अपघातात तरूणाचा मृत्यू

Share

जळगाव (प्रतिनिधी)

जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई – आग्रा महामार्गावर आज दि.१९ रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान बांभोरी कॉलेज गेटसमोर अपघात घडला. यात मोटार सायकल क्र.एम.एच.-१९ बी.वाय. ८५२१ यावरील चालक धमेंद्र मिथलेश बरहार (वय १६) याचा जागीच मृत्यू झाला.

खड्ड्यांमुळे झाला अपघात
जळगाव बांभोरी येथील जावळे नगरात राहणारा मयत इसम हा पाणीपुरीचा व्यवसाय करतो. तो जळगावकडे येत असताना खोल झालेल्या साईडपट्या व महामार्गावरील खड्डे यामुळे त्याची मोटार सायकल पडली व त्याच्या मागून येणारा ट्रक क्र. डब्ल्यु. बी. १७- ४३३५ च्या चाकाखाली येवून त्याचा जागीच मृत्यू झाला.

मयत तरूण उत्तरप्रदेशचा रहिवाशी
अपघातात मयत झालेला धमेंद्र बरहार हा उत्तर प्रदेशमधील उसरगाव, जि.जलोल येथील रहिवाशी असून तो बांभोरी जावळे नगरात राहणाऱ्या त्याच्या बहीणीकडे कामानिमित्त आला होता. तो पाणीपुरीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होता.

अपघातातील ट्रक जागेवरच सोडून ट्रक चालक फरार झाला आहे.

सदर मयताचे प्रेत शवविच्छेदन करून मुळगावी उत्तरप्रदेशकडे त्याचे नातेवाईक घेऊन जात असल्याचे समजते.

पोलीस कर्मचाऱ्याचे कर्तव्य

अपघात घडला त्यावेळी पोलीस कर्मचारी नारसिंग पाडवी हे जात असताना त्यांच्या लक्षात ही घटना लक्षात येताच महामार्गावरील झालेली वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व महामार्गावर झालेली वाहतुकीची कोंडी दूर करून ती सुरळीत केली.

महामार्गावर खड्ड्यांमुळे वारंवार होणारे अपघाताची संख्या बघता ती दिवसेंदिवस वाढतच असून अपघात टाळण्यासाठी संबंधीत विभाग जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असून सद्यस्थितीत महामार्गावर अनेकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. साईडपट्टा खोल झालेल्या आहेत. तरी संबंधीत विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!