Type to search

Breaking News जळगाव राजकीय

जळगावसाठी अजून १०० कोटी देणार- मुख्यमंत्री

Share

जळगाव –

महाजनादेश यात्रेनिमित्त आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागरपार्क येथे आयोजीत सभेत संबोधन करताना सांगितले की, जळगाव शहराच्या विकासासाठी आतापर्यंत भरभरून निधी दिला आहे. तो आपण योग्यरित्या खर्च करा, खर्च झाल्यावर आणखी १०० कोटी रूपये देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावकरांना दिले. जळगाव मनपा कर्जमुक्त करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशिल आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आ.एकनाथराव खडसे, आ.सुरजितसिंह ठाकूर, खा.रक्षा खडसे, ना.हरिभाऊ जावळे, खा.उन्मेश पाटील, संघटनमंत्री किशोर काळकर, जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आ.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, महापौर सीमा भोळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खान्देश आमच्या पाठीशी उभा राहीला

जेव्हा जव्हा आमचे सरकार आले तेव्हा तेव्हा जळगाव शहरासह संपूर्ण खान्देश आमच्या पाठीशी उभा राहीला. काँग्रेस, राष्ट्रवादी ईव्हीएमच्या नावाने ओरडत आहे. मशिन मतदान करत नसून मतदार मतदान करतो. त्यासाठी मतदारांच्या मनात घर करा तुम्हालाही मते मिळतील असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला.

मेगा गळती थांबविण्यासाठी प्रयत्न करा

भाजपमध्ये मेगा भरती सुरू असल्याचे विरोधक बोलत आहेत मात्र मी असे म्हणेल की, तुमच्याकडील मेगा गळती थांबविण्याचा प्रयत्न करा.

तुमचा आशिर्वाद समजून मुंबईला जातो

मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्व जनतेला आशिर्वाद देण्याची विनंती करून आपला आशिर्वाद आहे का? असा प्रश्न करत मंचावर उपस्थित सर्व आमदार, खासदारांचे नामोल्लेख करून यांनाही आशिर्वाद आहे का? असा प्रश्न करून तुमचा आशिर्वाद समजून मुंबईला जातो व येत्या निवडणूकीत जिंकून येत युतीचा झेंडा फडकवतो व पुन्हा जळगावकऱ्यांच्या भेटीसाठी येतो असे आश्वासन दिले.

काँग्रेस, राष्ट्रवादी खातेही उघडणार नाही – ना.गिरीश महाजन

महाजनादेश यात्रेच्या सभेत मतदारांशी संवाद साधताना ना.गिरीश महाजन म्हणाले की, मागील निवडणूकीत पारोळ्यात खातेतरी उघडले होते. यावेळेस तर त्यांचे खातेही उघडणार नाही व मी सांगितलेला आकडा पूर्णपणे निवडून येणारच असे ना.महाजन यांनी सांगितले. जिल्ह्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प पूर्ण झाले. काहींची कामे सुरू आहेत. सिचनाच्या प्रकल्पासाठी आमचे सरकार भरभरून निधी उपलब्ध करून देत असल्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!