विद्यार्थी साकारताहेत भव्य गणपती म्युरल

0
जळगाव । मु.जे.महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडागणावर गणपती म्युरल निर्मिती सुरु करण्यात आली. एक लिटर पाण्याच्या एक लाख बाटल्यांपासून श्री गणेशाचे म्युरल साकारले जात आहे. सायंकाळपर्यंत म्युरल निर्मितीचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. गणपती म्युरल निर्मितीची एशिया व इंडीया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद घेतली जाणार आहे.

आनंदयात्री डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी समारोपाच्या प्रकट कार्यक्रमाप्रित्यर्थ व खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वाटचालीच्या निमित्ताने आयोजित भव्य गणपती म्युरल निर्मिती कार्यक्रमाचे श्रीफळ फोडून आणि कलश पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, केसीई सोसायटीचे सदस्य दीपक घाणेकर, सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन नारळे, केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, दै.सकाळचे संपादक राहुल रनाळकर, कोषाध्यक्ष सुरेश चिरमाडे, ज्ञानदेव पाटील, हरीश मिलवाणी, सुधीर बेंडाळे, प्रा.चारुदत्त गोखले, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधी डॉ.ममता काबरा उपस्थित होते.

प्राचार्य अविनाश काटे यांच्यासह 50 विद्यार्थी गणपती म्युरलची निर्मिती करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले की, गणपती म्युरल निर्मिती करून केसीई संस्थेने खर्‍या अर्थाने भक्ती जपली आहे. गणेशोत्सवात सकारात्मक वातावरण निर्मिती व नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करून तरुणांनी समाजात आदर्श निर्माण करावेत, असेही ते म्हणाले. सचिन नारळे, राहुल रनाळकर, नंदकुमार बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रणिता झांबरे यांनी केले. यावेळी माजी महापौर ललित कोल्हे यांनी भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले. डॉ.अरुणाताई पाटील, जीवनताई झोपे, प्रशासकीय संचालक डॉ.डी.जी.हुंडीवाले, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, डॉ.एस.एन.भारंबे, प्रशासकीय अधिकारी गो.ह.अत्तरदे, प्राचार्य डॉ. अशोक राणे, मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी, ललित चौधरी उपस्थित होते.

लेझीम पथक, अथर्वशीर्ष पठणाने वेधले लक्ष
पथक प्रमुख डी.व्ही.चौधरी, एस.एच.बावस्कर यांचे मार्गदर्शनाखाली उपक्रमाच्या सुरुवातीला ए.टी.झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच 200 विद्यार्थिनीनी पी.के.झांबरे, व्ही.एस.गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्ष पठण केले.

36 तास आरोग्य सुविधा
गणपती म्युरल निर्मितीसाठी काम करण्यार्‍या विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मदर तेरेसा आरोग्य केंद्र आणि सोहम योग व नेचरोपथी केंद्रातर्फे ठेवण्यात आली आहे. डॉ.लीना चौधरी, प्रा.सोनल महाजन यांच्यासह वैद्यकीय पथक सेवा देत आहेत.

LEAVE A REPLY

*