उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव; विधेयक मंजूर

0

नागपूर, ता. 20 : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या विधेयकाला विधानसभेत यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी याबाबत विधेयक मांडले होते. या विधेयकाला मंजुरी देण्यापूर्वी सभागृहात बहिणाबाई चौधरी यांच्या अनेक कविता सदस्यांनी वाचून दाखवल्या.

या चर्चेत सदस्य सर्वश्री हेमंत टकले, डॉ. सुधीर तांबे, जयदेव गायकवाड, कपिल पाटील, विक्रम काळे, शरद रणपिसे, प्रकाश गजभिये, प्रा. जोगेंद्र कवाडे, अनिल सोले, हरीभाऊ राठोड, गिरीश व्यास, रामहरी रूपनवर, ख्वाजा बेग, विद्या चव्हाण, स्मिता वाघ यांनीही बहिणाबाई यांच्या योगदानावर माहिती दिली तर चंद्रकांत रघुवंशी यांनी अहिराणी भाषेतून विधेयकला पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

*