शेतकर्‍यांना पाणी, कर्जमाफी मिळाली पाहिजे – तोगडीया

0

जळगाव / देशात सध्याच्या स्थितीत शेतकर्‍यांच्या शेतमालाला हमी भाव, पुरेसे पाणी व त्यांची कर्जमाफी ही मिळाली पाहीजे. परंतू शासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत प्रविण तोगडीया यांनी व्यक्त केली.

बजरंग दलाच्या प्रशिक्षण शिबीराच्या दौर्‍यासाठी आज जळगाव दौर्‍यावर आले होते. याप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान पुढे बोलतांना तोगडीया म्हणाले की, सद्यस्थितीत देशामध्ये तीन तलाक पेक्षा शेतकरी आत्महत्या हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे.

शेतकर्‍यांच्या शेतमालाला पुर्वीपासूनच हमी भाव मिळत नाही. त्यांच्या कांदा उत्पादनाला प्रति किलो 10 रुपये खर्च येतो परंतू त्यांचा कांदा बाजारात 1 रुपये किलो प्रमाणे त्यांची विक्री करावे लागत आहे.

त्यामुळे शेतकर्‍याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतामध्ये पुरेसे पाणी दिले पाहिजे व त्यांना कर्ज माफी दिली पाहिजे. या तीन गोष्टींचा अ‍ॅक्शन प्लॅन करण्याची गरज असून तो तयार करुन त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी.

परंतू पूर्वीपासूनच शेतकर्‍यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याची नाराजी तोगडीया यांनी व्यक्त केली. तसेच उद्या औरंगाबाद जिल्ह्यात वासाडी येथे शेतकर्‍यांना मागदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होणार
उत्तरप्रदेशातील शासनाने लागू केलेल्या सॅटेलाईट प्रणाली द्वारे शेतात कोणते पिक लावले असून हेक्टरी किती उत्पादन मिळणार याचा अंदाज येईल. तसेच शेतात उत्पादित झालेल्या उत्पदनावरुन शेतमालाची आयात निर्यात केल्यास त्यांचा वार्षीक उत्पन्न वाढून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होणार आहे.

कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडी
पाकिस्तान सैन्याच्या तावडीत असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या फाशिला स्थगिती मिळाल्याने पाकिस्तानावर दबाव निर्माण झाला आहे. तसेच सैन्याला बंदि बनवून त्यांची शिरच्छेद करण्याच्या घटना वाढत असून कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच राहणार असून सैनिकांनी मिसाईल तयार ठेवा असे त्यांनी सांगीतले.

LEAVE A REPLY

*