अभियंता जावयाने बँकेच्या निवृत्त व्यवस्थापकाच्या डोक्यात टाकली फरशी

0
जळगाव  / संतप्त पत्नीला घेण्यासाठी आलेल्या अभियंता असलेल्या जावयाने स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापकाला फरशीच्या तुकड्याने मारहाण केली.
ही घटना आदर्शनगरमध्ये शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता घडली.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, धुळे येथील प्रशांत नामदेव वाघ ह्यांचा विवाह जळगावातील भुराज गिरीधर मोरे (वय 62 रा. आदर्शनगर) यांची मुलगही दीपमाला हिच्याशी झाला.

मोरे हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक आहेत तर प्रशांत वाघ हे अभियंता म्हणुन काम करीतात. गेल्या 13 वर्षापुर्वी दीपमाला सोबत प्रशांतचा विवाह झाला.

दोघांना दहा वर्षाचा संस्कर हा मुलगा आहे. लग्न झाल्यापासुन प्रशांत दीपमाला यांना नेहमीच त्रास देत होता. यामुळे दीपमाला ही काही वर्षापुर्वी माहेरी निघुन आली होती.

दरम्यान नातेवाईकांच्या मध्यस्थीनंतर दोघांनी पुन्हा संसाराला सुरवात केली. परंतु प्रशांत याने पत्नीला गांजपाठ करणे सुरुच ठेवले. दरम्यान दि.18 रोजी रात्रभर घरात कोंडून दीपमाला यांना प्रशांतने मारहाण केली.

त्यामुळे दुसर्‍या दिवशी दीपमाला मुलासह जळगाव माहेरी येवुन गेली. न सांगता माहेरी आल्याने प्रशांत यांचा संताप वाढल्याने त्याने शुक्रवारी सायंकाळी आदर्शनगर गाठले.

सासरे भुराज मोरे यांच्या घरात घुसून वाद घालत प्रशांतने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. याचवेळी भुराज मोरे यांचा मुलगा प्रदीप मोरे व त्याची पत्नी स्नेहल ह्यांनी मध्यस्थी घालण्याचा प्रयत्न केला.

परंतु प्रशांत शिवीगाळ देत असल्याने प्रदीप यांनी मेव्हुणाला घराच्या बाहेर जाण्याचे सांगितले. याचा राग आल्याने प्रशांतने बांधकामाठिकाणाहुन एक फरशीचा तुकडा आणुन प्रदीपला मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी प्रदीपला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या स्नेहल यांना तो तुकडा लागल्याने डोक्यात त्यांना दुखापत झाली. यानंतर प्रशांत सासरे भुराज मोरे यांनाही फरशीच्या तुकड्याने मारहाण केली.

दरम्यान जखमी अवस्थेत सुन व सासरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या जबाबावरुन रामानंदनगर पोलीसांत भुराज मोरे यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*