राज्यात राजकीय स्थित्यंतराची स्थिती

0
जळगाव  / राज्यात जळगाव जिल्हा हा भाजपाच्यादृष्टीने सक्षम आहे. राज्यात सध्या राजकीय स्थित्यंतराची स्थिती निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक अभय आगरकर यांनी आज येथे केले.
भाजपाच्या ग्रामीण कार्य विस्तारकाच्या अभ्यासवर्गाचे आज जि.प. अध्यक्षा ना. उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते उद् घाटन झाले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष उदय वाघ, डॉ. तुषार चांदवडकर, सभापती प्रभाकर सोनवणे, प्रा. सुनिल नेवे, पी.सी.पाटील, सुरेश धनके, अ‍ॅड. किशोर काळकर, पोपट भोळे, आदी मान्यवर उपस्थित होते. अभय आगरकर पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा.

पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधुन शेवटच्या घटकापर्यंत पोहचा असे आवाहन त्यांनी केले. प्रा. सुनिल नेवे म्हणाले की, अहंमपणा जोवर सुटणार नाही तोपर्यंत पंडीत दिनदयाळ उपाध्याय आपल्याला समजणार नाही.

यावेळी किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शशिकांत वाणी, यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यात 90 हजार बुथपर्यंत कार्यकर्ता पोहोचणार आहे.

दि. 25 मे ते 10 जुन या कालावधीत कार्यविस्तार योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 430 विस्तारकांची नेमणुक करण्यात आली आहे. सुत्रसंचालन सदाशिव पाटील यांनी तर आभार महेश पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

*