नीलेश भीलच्या शोधासाठी सहा पथके रवाना

0
जळगाव / मुक्ताईनगर येथील कोथळी खदान दरम्यान राहत असलेल्या शौर्य पुरस्कारप्राप्त निलेश भील व गणपत भील या दोघ भावांचे अपहरण करण्यात आले आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तयार करण्यात आली आहेत.

आजुबाजुच्या गावांमध्ये जावून दोघ बालकांचा शोध घेतला जात आहे. तसेच वेगवेगळ्या शक्यतांवरुन गुन्ह्याचा तपास केला जात आहे.

भील भावांबाबत माहिती मिळाल्यास सहाय्यक पोलिस अधीक्षक निलोत्पल (9130055008) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*