मिलिंद नार्वेकराचा फोटो उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा

0
मुंबई / शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधील फोटोची उंची पाहून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
या जाहिरातींमध्ये त्यांचे छायाचित्र आदित्य-उद्धव आणि चक्क बाळासाहेबांपेक्षाही मोठा आहे.
शिवसेनेसाठी आणि सैनिकांसाठी बाळासाहेबांपेक्षा मोठं कुणीच नाही. ते सार्‍यांचे दैवतच आहेत. त्यामुळे शिवसेनेचे पोस्टर असो किंवा होर्डिंग; त्यावर सगळ्यात वर बाळासाहेबांचा फोटो असतो, त्या खालोखाल उद्धव यांचा आणि त्याखाली आदित्य यांचा, शिवसेनेत तसा अलिखित नियमच आहे.
पण, मिलिंद नार्वेकर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यातर्फे वर्तमानपत्रांत जी जाहिरात देण्यात आली, त्यात सगळ्यात उंच आणि मोठा फोटो मिलिंद नार्वेकर यांचा आहे.

असा प्रकार शिवसेनेत पहिल्यांदाच झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. त्यावरून राजकीय वर्तुळात तर्कही लढवले जात आहेत.

नार्वेकर यांच्या फोटोतून काही वेगळे संकेतही मिळत असल्याचे म्हटले जात आहे. मिलिंद नार्वेकर यांचे अन्य पक्षांचे नेते आणि प्रशासकीय अधिकार्‍यांशीही त्यांचे खास संबंध आहेत.

गेल्या वर्षी गणेश चतुर्थीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी गेले होते. त्यातून, नार्वेकर यांचे प्रस्थ वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

LEAVE A REPLY

*