उष्माघाताने शेतकर्‍याचा मृत्यू

0
जळगाव / शेतातुन घरी परतल्यानंतर जेवण करताच उलटी झाल्याने उपचारासाठी शेतकर्‍याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान उन लागल्याचे नातेवाईकांनी सांगितल्यावरही डॉक्टरांनी रुग्णाला उष्माघात कक्षात न हलविता जनरल वार्डमध्ये उपचार सुरू केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील कमलाकर श्रावण पाटील (वय 40) हे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

कमलाकर पाटील हे आई राधाबाई, पत्नी कविता, मुलगा चेतन, मुलगी सोनल, कल्याणी यांच्यासोबत धामणगावला राहतात.

आज सकाळी शेतात कामानिमीत्त कमलाकर पाटील गेले. उन लागत असल्याने ते घरी आले. 11.30 वाजेच्या सुमारास त्यांनी जेवण केले.

जेवण केल्यानंतर त्यांना लागलीच उलटी झाली. उलटी झाल्याने पत्नी कविता व बहिण कल्पना यांनी त्यांना गावातील डॉक्टरांकडे नेले.

कमलाकरची प्रकृती खालवित असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे सल्ला दिला.पत्नी व बहिणीने कमलाकर यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले.

याठिकाणी डॉक्टरांना उन लागल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांना कविता व अलका यांनी सांगितले. त्यांच्या ऐकून न घेता वैद्यकिय अधिकार्‍यांनी उपचार करुन उष्माघात कक्षात किंवा अतिदक्षता विभागात कमलाकर पाटील यांनी न हलविता वार्ड क्रमांक 9 मध्ये उपचारार्थ दाखल करुन घेतले.

याठिकाणी पुन्हा कमलाकर यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ मगन मराठे करीत आहेत.

बहीण, पत्नीचा आक्रोश
रुग्णालयात अलका बहीण व पत्नी कविता कमलाकर यांच्या सोबत होत्या. डॉक्टरांनी कमलाकर यांना मयत घोषीत करतातच दोघांना आक्रोश केला.

काही दिवसापूर्वी भाच्याचे लग्न केले थाटात
कमलाकर यांनी बहीण अलका हिचा मुलगा राहुल याचे दि.9 मे धामणगावला थाटात लग्न केले. बहीणीचा लाडका आणि आईचा आधार गेल्याने संपूर्ण गावकर्‍यांकडून रुग्णालयात हळहळ व्यक्त केली जात होती.

LEAVE A REPLY

*