तक्रार निवारणासाठी मनपाचे कॉल सेंटर, स्मार्ट जळगाव अ‍ॅप

0
जळगाव  / महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी कॉल सेंटर आणि स्मार्ट जळगाव अ‍ॅप कार्यान्वीत करण्यात आले आहे.
या कार्यप्रणालीचा शुभारंभ दि.20 रोजी होणार असल्याची माहिती आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिली.
बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, नळ संयोजन, मृत्यू दाखला काढणे, किंवा अन्य माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना महापालिकेत यावे लागते.
कधी-कधी अधिकारी गैरहजर असल्याने किंवा अन्य कामात व्यस्त असल्याने ही माहिती नागरिकांना मिळू शकत नाही. परिणामी वेळ वाया जातो.
तसेच आर्थिक भुर्दंड देखील सोसावे लागते. ही सर्व फिराफिर टाळण्यासाठी किंवा तात्काळ माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयुक्त जीवन सोनवणे यांनी कॉल सेंटर कार्यान्वीत करण्याचा निर्णय घेतला.

स्मार्ट जळगाव अ‍ॅप देखील कार्यान्वीत करण्यात आले आहे. कॉल सेंटर आणि स्मार्ट जळगाव अ‍ॅप यावर जवळपास 90 प्रकारच्या तक्रारी नोंदविणे शक्य होणार आहे.

कॉलसेंटरसाठी 6900051000 हा युनिक क्रमांक देण्यात आलेला आहे. सकाळी 7 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंत कॉल सेंटरला तक्रारी नोंदवून घेतल्या जातील किंवा माहिती जाणून घेता येईल.

तक्रार निवारण न झाल्यास दंडात्मक कारवाई
दर महिन्याला विभागनिहाय तक्रारींचा तक्ता तयार केला जाईल. यात किती तक्रारी आल्यात किंवा तक्रारींचे निराकरण झाले. याबाबत माहिती घेतली जाईल. सर्वाधिक तक्रारींचे निवारण करणार्‍या पहिल्या तीन विभागांना दरमहिन्याला पारितोषित दिले जातील. तर सर्वात कमी तक्रार निवारण करणार्‍या शेवटच्या तीन विभागांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*