दूषित पाणीपुरवठाबाबत उपाययोजना न केल्यास आंदोलन

0
जळगाव  / शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा वितरीत होत आहे. मागील स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतरही कुठलीही उपाययोजना केली गेली नाही.
त्यामुळे उपाययोजना न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बंटी जोशी यांनी दिला. दरम्यान, दोन दिवसापूर्वी सानेगुरुजी नगरातील रहिवासी दुषित पाण्याच्या बॉटल्स घेवून घरी आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून अनेक भागात पिवळ्या रंगाचा व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे.
यावर प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा मुद्दा मागिल स्थायी सभेत नगरसेवक बंटी जोशी, पृथ्वीराज सोनवणे यांनी उपस्थित केला होता.

यावर आयुक्त जीवन सोनवणे यांनी महाराष्ट जीवन प्राधिकरण विभागाच्या अभियंत्यांकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून तातडीने उपायोजना करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते.

तसेच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी.एस.खडके यांना वेगवेगळ्या भागातील पाण्याचे नमूने घेण्याची सुचना दिली होती. परंतु सात दिवस उलटवून देखील दुषित पाण्याचे नमूने घेतलेले नाही.

सानेगुरुजी नगरातील सीए सुनिल ललवाणी यांनी त्यांच्याकडे दुर्गंधीयुक्त पाणी आल्याने त्या पाण्याचे नमूने बाटलीत भरुन माझ्या घरी आणले होते.

अशी माहीतीही बंटी जोशी यांनी दिली. यापुढे प्रशासनाने उपाययोजनांसाठी पावले न उचलल्यास मनसेकडून जलशुध्दीकरण प्रकल्पाची तपासणी केली जाईल. तसेच पाणी प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

 

LEAVE A REPLY

*