जळगावात दुचाकीच्या डिक्कीतून चार लाखाची रोकड लंपास-video

0
जळगाव / जळगाव शहरातील गुजराथ स्विट मार्टसमोर उभ्या असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरटयांनी लाईट गेल्याचा फायदा घेत सुमारे चार लाखांची रोकड लांबविल्याची घटना रात्री 7.45 वाजेच्या सुमारास घडली.

दाणाबाजारातील साखरीचे व्यापारी जिकर हाजीयुसुफ रानाणी रा. मेहरुण यांनी 7 वाजेच्या सुमारास दुकान बंद केले. ते त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच 19- एव्ही 2414 ने घरी जाण्यासाठी निघाले.

चित्रा चौकातून ते मिठाई घेण्यासाठी गुजराथ स्विट मार्ट येथे आले. त्यांनी त्यांची दुचाकी स्विट मार्टच्या बाहेर लावून मिठाई खरेदी करण्यासाठी आत गेले.

याचवेळी परिसरातील लाईट गेली असल्याने चोरटयांनी अंधाराचा फायदा घेत मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरटयांनी दुचाकीची डिक्की फोडून सुमारे चार लाखाची रोकड लांबविली.

रानाणी मिठाई घेवून दुकानाबाहेर आले. त्यांना दुचाकीची डिक्की उघडी दिसली. त्यावेळी त्यांनी दुचाकीच्या डिक्कीत झोकुन बघितले असता, दुचाकीमधील पिशवी न दिसून आल्याने डिक्कीतील रोकड चोरीला गेल्याचे समजले.

चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
रानाणी यांनी गुजराथ स्विटमार्टच्या बाहेर गाडी लावून ते मिठाई घेण्यासाठी आत गेले.

यावेळी परिसरातील लाईट गेली असल्याने दुचाकीवर आलेल्या दोन चोरटयांनी दुचाकीची डिक्की फोडली.

दरम्यान दोन्ही चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले असून पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहे.

पोलिसात गुन्हा दाखल नाही
रानाणी यांना दुचाकीच्या डिक्कीतून रोकड गेल्याचे समजल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा पेठ पोलिसात धाव घेवून पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दरम्यान रानाणी यांच्या दुकानात शुक्रवारी व शनिवार या दोन दिवसांची रोकड त्यांच्या दुकानात होती. तसेच यावेळी दाणाबाजार परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झालेला असल्याने त्यांनी रोकड न मोजता पिशवीत ठेवली. त्यामुळे चोरीला गेलेली रक्कम किती आहे. याबाबत रानाणी यांना देखील माहित नव्हते.

दरम्यान रानाणी यांनी चार ते पाच लाख रुपये असल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिसांत गुनहा दाखल नव्हता.

डीवायएसपींची घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती कळताच डिवायएसपी सचिन सांगळे यांनी घटनास्थळी पाहणी करून जिल्हा पेठ पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याचे सांगितले. दरम्यान सांगळे यांनी जिल्हापेठला येवून रानाणी यांच्याकडून घटनेची माहीती घेतली. दरम्यान चोरटे रानाणी यांच्या दुकानापासून त्यांच्या मागावार असल्याचे बोलले जात होते.

LEAVE A REPLY

*