कर्जमाफीची वेळ पंचांगामध्ये बघणार का : अजित पवारांची टीका

0
रत्नागिरी  / संघर्ष यात्रेदरम्यान राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना मुख्यमंत्री कर्जमाफीच्या निर्णयासाठी योग्य वेळ पंचांगामध्ये पाहणार आहेत का ? असा सवाल उपस्थित करीत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेतले.
राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार सरकारचा समाचार घेताना म्हणाले की, शेतकरी आत्महत्येला सरकार बेजबाबदार आहे. आधी शेतकर्‍यांना तूर लावायला सांगितली आणि आता पाठ फिरवली आहे.
भाजप सरकारच्या संवाद यात्रेवरही पवारांनी टीका केली. ते म्हणाले की सत्ताधारी पक्षांनी निर्णय घ्यायचे असतात, मात्र तेच आता आंदोलन काढत फिरत आहेत.

शिवसेना सत्ताधारी पक्षात आहे की विरोधात आहे त्यांचे त्यांना कळत नाही. सरकार हे पाकीटमार असून सध्या गुंडांचे राज्य सुरु आहे. शिवसेनच शेतकरी प्रेम हे बेगडी असल्याचेही त्यांनी म्हटले.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही संघर्ष यात्रेदरम्यान सरकारवर चांगलीच तोफ डागली. सरकारची अभ्यास करण्याची वेळ संपली असून आता इतर राज्यांप्रमाणे कॉपी करुन कर्जमाफी करा असा टोला त्यांनी सरकारला लावला.

शिवसेनेने शिवराळ यात्रा सुरू करा, असा उपहासात्मक सल्ला शिवसेनेला त्यांनी दिला आहे. शिवसेना लोकांच्या भावनेशी खेळत आहे.

जनतेच्या भावनेशी प्रामाणिक असेल, तर शिवसेनेने तात्काळ सत्तेतून बाहेर पडून, रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे त्यांनी सेनेला आव्हान दिले.

पेट्रोलचे दर वाढवून समाधान झाले नाही त्यामुळे सरकारने आता मुद्रांक शुल्क वाढवल्याचेही त्यांनी म्हटले.

 

LEAVE A REPLY

*