एका मराठी माणसासाठी एका मराठी माणसाची सातासमुद्रापार यशस्वी लढाई !

0
मुंबई  / अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.
असा निकाल देत आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानला मोठा धक्का दिला. आंतरराष्ट्रीय कोर्टानं सुनावलेल्या या निर्णयासाठी भारताचे वकील हरीश साळवे यांचा युक्तीवाद फार महत्वाचा ठरला.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण देशातून याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया आल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या या निकालानंतर भारतानं थेट आंतरराष्ट्रीय कोर्टाचे दरवाजे ठोठावले.

कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारताकडून बॅरिस्टर हरीश साळवे यांची निवड करण्यात आली.

हरीश साळवे यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात अतिशय समर्पक शब्दात पाकिस्तानचा खोटेपणा उघड केला. याचवेळी पाकनं व्हिएन्ना कराराचा भंग केल्याचंही त्यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टाला पटवून दिलं.

या संर्पू्ण युक्तीवादाचा आज परिणाम पाहायला मिळाला. हरीश साळवेंच्या याच युक्तीवादानंतर अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही.असं आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानला ठणकावून सांगितलं.

या संपूर्ण प्रकरणात हरीश साळवे यांनी बजावलेली भूमिका फार महत्वाची होती. त्यामुळे कुलभूषण जाधवांसाठी सातासमुद्रापार लढलेली लढाई एका मराठी माणसामुळे यशस्वी ठरली. असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

हरीश साळवे हे प्रत्येक खटल्यासाठी लाखो रुपये घेतात असा त्यांचा लौकीक आहे. पण या खटल्यामध्ये हरीश साळवे यांनी फक्त 1 रुपये फी घेतली.

खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबत टवीटरवरुन माहिती दिली.

LEAVE A REPLY

*