चाळीसगावात एकाचा उष्माघाताने मृत्यू

0
चाळीसगाव / चाळीसगाव  शहरातील अफूगल्लीतील एकाचा चक्कर येवून पडल्याने मृत्यू झाला.
उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे.
या घटनेबाबत माहिती अशी की, नागदरोडलगत एक अनोळखी इसम  पडून असल्याचे लक्षात येताच त्याला  ग्रामीण रुग्णालयात १७ रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान उपचारार्थ दाखल करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित झाले. तपासीअंती त्याची ओळख पटली असून त्याचे नाव भास्कर गुलाबराव जाधव (वय ५०, रा.अफूगल्ली) असे आहे.

उष्माघाताचा त्रास झाल्याने तो रस्त्यावर पडून होता त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याची  परिसरात चर्चा आहे.

शहर पोलिसात १८ रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.कॉ. मिलिंद शिंदे करीत आहे.

LEAVE A REPLY

*