स्वाईन फ्लूने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
वाशिम  /  स्वाइन फ्लूफच्या आजाराने रिसोड तालुक्यामधील रिठद गावातील एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी घडली असून अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू होते.
सामान्यत: 24 अंश सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात या आजाराचा विषाणू तग धरत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
परंतु जिल्ह्यातील तापमान 42 अंशांच्या घरात असतानाही ङ्गस्वाइन फ्लूफचे रुग्ण आढळत आहेत.

रिठद येथील 12 वर्षीय मुलाला ङ्गस्वाइन फ्लूफसदृश आजाराची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याला अकोल्यातील एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*