मटका अन् व्हिडिओ पार्लर अड्डा उद्ध्वस्त

0
ठाणे  / मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गजबजलेले स्थानक म्हणून डोंबिवलीचे स्थानकाची ओळख आहे.
मात्र, याच रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकार्‍यांच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्याचा भांडाफोड गुरुवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून करण्यात आला.
यानंतर स्थानकाचे स्टेशनमास्तर, तसेच जीआरपी आणि आरपीएफच्या अधिकार्‍यांना संबंधित मटका केंद्र आणि व्हिडिओ पार्लर ताबडतोब सील करण्यास सांगितले.
तसेच संबंधित अधिकार्‍यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश खा. डॉ. शिंदे यांनी लोहमार्ग वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिरेमठ यांना दिले.
खा. डॉ. शिंदे यांना डोंबिवली स्थानकातील गैरसोयींबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमाराला स्थानकाला भेट दिली.
याप्रसंगी फलाट क्र. 1 येथे कल्याणच्या दिशेने रेल्वे स्थानकाच्या हद्दीत बेकायदा मटका केंद्र आणि व्हिडिओ पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर खा. डॉ. शिंदे यांनी रेल्वे अधिकार्‍यांना संबंधित प्रकाराचा जाब विचारत धारेवर धरले.

खा. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही अड्डे शिवसेनेने बंद पाडले. खा. डॉ. शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांना पाचारण करून हे दोन्ही अड्डे त्वरित सील करण्यास सांगितले.

तसेच, आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिश्रा, जीआरपीचे सहायक पोलिस निरीक्षक डोळे आणि स्टेशन मास्तर ओ. पी. करोठिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.

 

LEAVE A REPLY

*