विजय मल्ल्याचे फार्महाऊस ईडीच्या ताब्यात !

0
मुंबई  / देशातील विविध बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेला अद्योगपती विजय मल्ल्या याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जोरदार झटका दिला असून मल्ल्याच्या मालकीचा 100 कोटी रुपये किंमतीचा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील फार्महाऊस ताब्यात घेण्यात आला आहे.
मनी लाँडरिंग प्रकरणी मईडीफने ही कारवाई केली आहे. विविध बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून विजय मल्ल्या बि—टनमध्ये पळून गेला असून भारताच्या विनंतीनंतर त्याला 18 एप्रिल रोजी अटकही करण्यात आली होती.
तो सध्या जामिनावर सुटलेला असून त्याला भारतात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

अलिबागमधील मांडवा येथे 17 एकर भूखंडावर हा फार्महाऊस पसरलेला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये या फार्महाऊसवर तात्पुरती जप्ती आणण्यात आली होती.

त्यानंतर या कारवाईला अपिलीय लवादाकडे आव्हान देण्यात आले होते. विजय मल्ल्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या मांडवा फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे आव्हान दिले होते.

मात्र, दोन दिवसांपूर्वीच हे आव्हान फेटाळण्यात आले आणि ईडीने आज या फार्महाऊसवर कारवाईचे पाऊल उचलले. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने हा फार्महाऊस आज ताब्यात घेतला.

या फार्महाऊसचे नोंदणीकृत मूल्य 25 कोटी तर बाजारभावानुसार मूल्य 100 कोटी रुपये इतके असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*