आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला बंधनकारक – उज्वल निकम

0
मुंबई  / आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हा निकाल पाकिस्तानला बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला निकालाने पाकिस्तानच्या जिव्हारी जखम झाली आहे.
या निकालाचे पालन करणे पाकिस्तानला बंधनकारक आहे. जर पाकिस्तानने या निकालाचे पालन केले नाही. तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव येईल.

या निकालामुळे पाकिस्तानात आता 2 गट पडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मत निकम यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, एक गट न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे मानणारा असेल.

तर दुसरा गट जनतेच्या भावना विचारात घेऊन कदाचित आदेशाचे पालन करणे टाळावे असे म्हणणारा असेल.

मात्र या निकालाने पाकिस्तानचा खोडसाळपणा जगासमोर आला असून पाकिस्तान तोंडघशी पडला आहे.

कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत नाकारणे आणि वकील न देणे यासारख्या कृत्याने पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केल्याचे आज उघड झाले, असेही उज्वल निकम यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*