राम शिंदे-रामदास कदम यांच्यात जुंपली

0
मुंबई / जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या कथित भ—ष्टाचाराच्या आरोपांवर जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
जलयुक्त शिवारच्या मुद्याहून, जलसंधारण मंत्री राम शिंदे बालीश आहेत, असे म्हणत ते माझी अर्धवट आणि बदनामी करणारी माहीती मीडियाला देत आहेत, असे रामदास कदम म्हणाले.
रामदास कदम

 

राम शिंदे
जलयुक्त शिवारच्या योजनेबाबत कदम यांनी माहिती घेऊन माध्यमांऐवजी सरकारकडे तक्रार करायला हवी होती असे राम शिंदे यांनी काल म्हटले होते.

शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांना मी त्यांची माफी मागितली, तसेच मुख्यमंत्र्यांनी मला खडसावले, अशा खोट्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांना दिल्या, असा आरोप कदम यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

जलयुक्त शिवार योजनेत झालेला भ—ष्टाचार लपवण्यासाठी शिंदे अशी कृत्य करत असल्याचे कदम यांनी सांगितले. रत्नागिरीमध्ये जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ—ष्टाचार झाला असल्याचा आरोप कदम यांनी केला.

अधिकारी आणि स्थानिक आमदार यांच्या मध्यस्तीने जलयुक्त शिवारच्या योजनेत भ—ष्टाचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पंचनदी येथे 16 लाख रुपयांचे काम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र त्या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही. तसेच एकाच ठेकेदाराला 24 ठिकाणी काम देण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवारच्या योजनेत झालेल्या भ—ष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

दरम्यान कदम यांनी कशाच्या आधारावर काय आरोप केले आहेत, याची माहिती घेऊन प्रतिक्रिया देणार असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*