इंजिनिअरिंगचा पेपर घरात.. 25 विद्यार्थ्यांसह नगरसेवकाला अटक

0
औरंगाबाद / शहरातील हर्सूल परिसरातील नगरसेवक सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाची परीक्षा झालेले पेपर पुन्हा सोडवताना 22 तरूण आणि 3 मुलींसह काही प्राध्यापकांना गुन्हे शाखेच्या पथकाने आज (बुधवार) ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधूकर सावंत यांनी याबाबत माहिती दिली.
 सिडको भागातील नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीचे विद्यार्थी पेपर सोडवत असल्याची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना समजली.
त्यानंतर सकाळी गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक बांगर व त्यांच्या पथकाने तेथे छापा घातला. त्यावेळी अभियांत्रिकीच्या बांधकाम (सिव्हील) विद्याशाखेचे, बिल्डींग कन्स्ट्रक्शन्स या विषयाचे पेपर पुन्हा सोडवताना तब्बल 22 तरूण व 3 तरूणी तसेच प्राध्यापक पोलिसांना आढळले.

नगरसेवकाच्याच घरी असा प्रकार उजेडात आल्याने मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

सुरेवाडी येथील नगरसेवक सिताराम सुरे यांच्या इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी पेपर लिहिताना आढळून आले.

औरंगाबाद गुन्हे शाखेने ही धडक कारवाई केली आहे. साई इन्स्टिट्यूट ऑॅफ इंजिनिअरिंगच्या बी.ई.सिव्हिल तृतीय वर्षाचा सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड ड्रॉईंग या विषयाचा पेपर मंगळवारी झाला .

मात्र या विद्यार्थ्यांनी केवळ एकाच प्रश्नाचे उत्तर लिहून उर्वरित उत्तरपत्रिका कोरी ठेवली होती. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना नगरसेवक सिताराम सुरे यांच्या घरी बोलावण्यात आले.

तेथे 2 खोल्यांमध्ये बसून सर्व विद्यार्थी पेपर सोडवत होते. धक्कादायक बाब म्हणजे प्राध्यापकच त्यांना उत्तरे सांगत होते.या प्रकाराची माहिती मिळाताच गुन्हे शाखेच्या पथकाने सुरें यांच्या घरावर धाड टाकून कारवाई करत सर्वांना ताब्यात घेतले.

इंजिनिअरिंगचा झालेला पेपर दुसर्‍या दिवशी एका घरात सोडवणार्‍या 25 विद्यार्थ्यांनंतर, आता शिवसेना नगरसेवकालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सीताराम सुरे असं या शिवसेना नगरसेवकाचे नाव आहे.

तसेच याप्रकरणी बामूफ विद्यापीठाने साई महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग परिक्षेचं केंद्र तात्काळ रद्द केलं आहे.

इतकंच नाही तर वेळ पडल्यास त्या महाविद्यालयात पूर्वी झालेले सर्व विषयांचे पेपर रद्द करु, असाही इशारा परीक्षा विभागप्रमुख डॉ. दिगंबर नेटके यांनी दिला.

 

LEAVE A REPLY

*