..अन् लग्नाच्या दिवशीच शेतकरी पुत्राने संपविली जीवनयात्रा !

0
परभणी / शेतकर्‍याच्या मुलाने वडिलांचे कर्ज आणि आर्थिक विवंचनेतून होणारा आपला विवाह या सर्वाला कंटाळून लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली.
ही घटना मानवत तालुक्यातील सारंगापूर येथे घडली आहे. या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. कैलास शिवाजी राठोड (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, की कैलासचा विवाह मंगळवारी 16 मे रोजी सारंगापूर येथे होणार होता. त्याची होणारी नववधू ब—ह्मवाडी (ता. लातुर जि. लातूर) येथील आहे.

तिला हळदीच्या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी नातेवाईक गाडी करुन गेले होते. परंतु, सकाळी 7 वाजल्यापासून कैलास घरात दिसला नाही.

हे पाहुन घरातील मंडळी कैलासचा शोध घेऊ लागले. तेव्हा 8.30 वाजता कैलासने स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे आढळून आले.

ब—ह्मवाडीस वधुला आणण्यासाठी गेलेली गाडी पोखर्णीपर्यंत गेली होती. त्या गाडीसही तत्काळ परत बोलविण्यात आले. कैलासचा मृतदेह मानवत येथील ग—ामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

कैलास राठोड यांचे वडील शिवाजी राठोड यांच्या नावावर दीड एकर जमीन आहे. ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असायचे. शिवाय त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते.

वडिलांचा कर्जबाजारीपणा आणि त्यात स्वत:च्या लग्नाला होणारा खर्च या सर्व विवंचनेतून कैलासने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

 

LEAVE A REPLY

*