आश्चर्य ! लुप्त पावलेली विहीर 19 वर्षांनी दिसली सरोवरावर

0
बुलडाणा / जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अशा लोणार सरोवरामध्ये कमळा मातेचे मंदिर आहे. याच मंदिरा समोर एक विहीर आहे. या विहिरीला योनी कुंड (सौभाग्य तीर्थ) असेसुद्धा संबोधले जाते.
तसेच, आश्चर्य म्हणजे सासू- सुनेची विहीर या नावानेसुद्धा या विहिरीस ओळखण्यात येते.
ही विहीर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. या विहिरीचे पाणी म्हणजे समुद्र आणि नदी यांचा खास मिलाफ म्हणावा असे जाणवते.
याचमुळे या विहिरीला सासू- सुनेची विहीर असे संबोधले जाते. याचे खास असे की विहिरीची जी बाजू देवीच्या मंदिराकडे आहे तेथील पाण्याची चव गोड आहे.
त्यामुळे त्या बाजूने विहिरीला सुनेची विहीर, तर सरोवराकडील बाजूचे पाणी हे खारट असल्याने त्या बाजूने विहिरीला सासूची विहीर असे नाव पाडले गेले.

अशी ही आगळी- वेगळी विहीर सरोवरात 19 वर्षांपूर्वी, म्हणजेच 1998 साली दिसली होती.

गेल्या चार वर्षांपासून कमी होत चाललेल्या पाण्याच्या पातळीमुळे ही सासू-सुनेची विहीर गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे पाण्याच्या पातळीच्या वर आलेली आहे.

त्यामुळे सरोवरातील, ऐतिहासिक पौराणिक काळामध्ये नोंद असलेल्या या सासू-सून विहिरीचे दर्शन पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

LEAVE A REPLY

*