…तर मी उद्धव ठाकरेंना सांगितले असते : राम शिंदे

0
मुंबई / जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता.
त्यावरून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सरकारवर आरोप केला होता. जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणारे उद्धव ठाकरे यांनी आरोप करण्यापूर्वी मला विचारले असते तर मी सांगितले असते, असे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटले आहे.
सिंचन गैरव्यवहाराप्रमाणे जलयुक्त शिवारमध्ये गैरव्यवहार झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर उत्तर देताना राम शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

राम शिंदे

यावर राम शिंदे म्हणाले, की उद्धव ठाकरेंनी टीका करण्यापूर्वी माहिती घ्यायला हवी होती. मला विचारले असते तर मी सांगितले असते. रामदास कदम यांच्या माहितीवर उद्धव बोलले असतील.

या आरोपांप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपयर्ंत अहवाल येईल. दोषी आढळल्यास कारवाई होणार.

जे कोणी दोषी आहे त्यांचे निलंबन करून कारवाई करण्यात येईल. रामदास कदम यांनी माध्यमात सांगण्यापूर्वी आम्हाला सांगितले असते तरी चौकशी केलीच असती.

ते ही सरकारमध्ये सहभागी आहेत. सामूहिक जबाबदारी असते. राज्यमंत्री तर शिवसेनेचे आहेत. त्यांची नाराजी पालकमंत्र्यांवर असेल.

जलयुक्त समितीचे प्रमुख पालकमंत्री असतात. आम्हाला सांगितले असते कारवाई झाली नसती तर मीडियाकडे जायला हवे होते, असेही राम शिंदे म्हणाले.

LEAVE A REPLY

*