तलावातील गाळात फसल्यानं दोन भावांचा दुर्दैर्वी मृत्यू

0
हिंगोली / तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हिंगोली जिल्ह्यातील जलालदाभा इथं ही घटना घडली आहे.
महेश (10 वर्ष) आणि मंगेश बाळू घोंगडे (13 वर्ष) अशी या दोन भावांची नावं आहेत.
मंगळवारी दुपारी चार वाजल्याच्या दरम्यान ते काकडदाभा येथील तलावात पोहायला गेले होते… या तलावातील गाळात फसल्यानं त्यांचा पाण्यात बुडुन दुर्दवी अंत झालाय.

छोटा भाऊ महेश गाळात फसलाय हे पाहून लहानगा महेश त्याला वाचवण्यासाठी खोल पाण्यात गेला… आणि तोही गाळात अडकला.

धक्कादायक म्हणजे, मागच्याच वर्षी या तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्यात आला होता. त्यामुळे तलावाची खोली वाढली होती… अनेक ठिकाणी खड्डे पडून त्यात गाळ साचला झालाय.

दोन्ही मुलांचा तलावात बुडुन मृत्यू झाल्याने घोंगडे कुटुंबियांसह जलालदाभा गावावर शोककळा पसरलीय.

 

LEAVE A REPLY

*