जिल्ह्यात एप्रिल अखेर केवळ दोन टक्के कर्जवाटप

0
जळगाव / जिल्ह्यात एप्रिल महिना अखेरपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा बँकेकडुन केवळ दोन टक्के कर्ज वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे.
खरीप हंगाम जवळ येऊन ठेपला आहे. अशात शेतकर्‍यांची मायबाप संस्था असलेल्या जिल्हा बँकेची वसुली ठप्प झाल्याने कर्जवाटप केले जात नाही.
राष्ट्रीयकृत बँकांनीही शेतकर्‍यांना पुरेसा कर्जपुरवठा केलेला नाही. यासंदर्भात अधिक माहीती घेतली असता जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक, ग्रामीण बँक, खाजगी बँक मिळुन अवघे 1.95 टक्के कर्जवाटप झाल्याची माहिती समोर आली आहे.

यात जिल्हा बँकेने आत्तापर्यंत 6794 शेतकर्‍यांना 42 कोटी 99 लाख रूपयांचे कर्जवाटप केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 56 शेतकर्‍यांना 64 लाख रूपयांचे कर्जवितरण केले आहे.

ग्रामीण बँकांनी 39 शेतकर्‍यांना 47 लाखाचे कर्जवाटप केले आहे. तसेच खाजगी बँकांनी 217 शेतकर्‍यांना 8 कोटी 16 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

एप्रिल अखेरपर्यंतचा हा अहवाल प्राप्त झाला असुन कर्जवाटपासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*